अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फझल गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. या दोघांचे लग्न तीन शहरात अगदी धुमधड्याक्यात झाले. आता या जोडप्याने एक नवीन निर्णय घेतला आहे. रिचा चड्ढा आणि अली फझल यांनी त्यांच्या लग्नाची डॉक्युमेंट्री करायचे ठरवले आहे.
रिचा चड्ढा आणि अली फझल यांच्या लग्नाच्या या डॉक्युमेंट्रीची नाव 'RiAlity' असे ठेवण्यात आले आहे. हिंदुस्थान टाईम्स यांनीही ही माहिती दिली आहे.
रिचा चड्ढा आणि अली फझल यांनी त्यांच्या लग्नाची वनांच डॉक्युमेंट्री रिलीज करण्यासाठी खास दिवस निवडला आहे. रिचा आणि अली फाझल यांच्या लग्न सोहळ्याची सुरुवात ६ ऑक्टोबरपासून झाली. दिल्ली, लखनऊ आणि मुंबई या शहरांमध्ये अली आणि रिचा लग्नसोहळा पार पडला.
रिचा चड्ढा म्हणते, 'लग्न म्हणजे परीकथा असल्याचे भासवले जाते. पण खरंतर लग्न म्हणजे भावनांचे मिश्रण आहे. आनंद, चिंता, उत्साह आणि खूप काही यामध्ये असतं. आमची डॉक्युमेंट्रीमध्ये 'RiAlity'मध्ये आम्ही माच्या लग्नातील अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
रिचा चड्ढा पुढे असेही म्हणाली की, 'आमचे लग्न म्हणजे भावनांच्या धाग्यांनी विणलेली वेल आहे. 'RiAlity' मधून आम्ही आमचा अनुभवातील गुंतागुंत उलघडली आहे. या डॉक्युमेंट्रीमधून दोन व्यक्तीचा खरा प्रवास अगदी नितळपणे दाखवला आहे.'
'RiAlity' तयार करण्याचा निर्णय त्यांनी त्यांचे क्लीअर आणि अनफिल्टर पद्धतीने दाखविण्याच्ये हेतूमुळे झाला. राहुल सिंग दत्ता यांनी ही डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केली आहे. लग्न आणि लग्नाचे दिवस कसे असतात, याचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी समोर आणेल आहे. जोडपे लग्नाच्या वेळी त्यांच्या निर्णयाबद्दल काय बोलतात. हे बाहरेच्या लॊकांच्या दृष्टिकोनातून दाखविण्यात आली आहे. (Latest Entertainmnet News)
अली फझल त्याच्या लग्नाविषयी म्हणाला, "आमच्या भावना, संघर्ष आणि आमच्या एकत्र येण्याचा विजय आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहेत".
अली फझल पुढे म्हणाला की, "RiAlity मधून आम्ही हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे की प्रेम परिपूर्ण नसते, परंतु ते नेहमीच पुरेसे असते. प्रेम खोल आहे, ते गोंधळलेले असते. 'RiAlity' आमच्या प्रवासाचा सार आहे. फक्त कलाकार म्हणून नाही तर प्रेमात असलेल्या दोन सर्वसामान्य व्यक्तींसारखे आहे. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून आमचे दोष, स्वप्ने आणि आम्ही दोघे म्हणून जे काही आहोत ते दाखवणार आहोत.'
अली फझल आणि रिचा चड्ढा उयांची ही डॉक्युमेंट्री या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातही प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.