Fukrey 3 Leaked: 'फुकरे 3' ला मोठं नुकसान! प्रदर्शनापूर्वीच लीक: सोशल मीडियावर फ्री लिंकचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल

Fukrey 3 Released Date: 'फुकरे ३' हा विनोदी चित्रपट २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Fukrey 3 Leaked
Fukrey 3 LeakedSaam Tv

Fukrey 3 Movie Leaked:

'फुकरे ३' हा विनोदी चित्रपट २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चुचा, हनी आणि भोली पंजाबन प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. पहिल्या भागानंतर निर्माण झालेली चित्रपटाची क्रेझ अधिकच वाढली आहे.

'फुकरे ३'सध्या एका वेगळाच्या कारणाने चर्चेत आहे. ट्विटरवर (म्हणजे आताचे एक्स) #Fukrey3Leaked हॅशटॅग ट्रेंड करत आहे. काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की 'फुकरे ३' टेलिग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर लीक झाला आहे.

काही एक्स युजर्सनी युट्युब लिंक आणि टेलेग्रामचे स्क्रिनशॉट शेअर करत 'फुकरे ३' फ्री डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. चित्रपट HD प्रिंटमध्ये उपलब्ध आहे, तसेच ही सेन्सर कॉपी आहे. असे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंवर लिहिले आहे.

Fukrey 3 Leaked
Dev Anand Love Story: देव आनंद यांना सुरैयासोबत करायचं होतं लग्न, धर्म आडवा आल्याने अधुरी राहिली प्रेम कहाणी

लीक व्हिडीओमागील सत्य

चित्रपटाचा लीक होत असलेल्या २:३० तासाच्या व्हिडीओमध्ये चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि चित्रपटाची गाणी आहेत. याचा अर्थ चित्रपट लीक झालेला नाही. त्यामुळे निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे चित्रपट लीक होणे हे चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी अतिशय धक्कादायक होते.

चित्रपटाची कास्ट

चित्रपटाच्या पहिल्या भागात पुलकित सम्राट (हनी), मंजोत सिंग (लाली), वरून शर्मा (चुचा), रिचा चड्ढा (भोली पंजाबन), पंकज तिवारी (पंडितजी) तसेच अली फझल अशी स्टार कास्ट होती. अली फझल वगळता इतर सर्वजण आपल्याला 'फुकरे ३'मध्ये देखील दिसणार आहेत.

चित्रपट आधी ७ सप्टेंबर २०२३ला प्रदर्शित होणार आहे. पण या कंदिवशी 'जवान' प्रदर्शित झाला त्यामुळे 'फुकरे ३'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट १ डिसेंबर करण्यात आली होती. परंतु या दिवशी शाहरुख खानचा 'डंकी' आणि प्रभासचा 'सलार' प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटाची तारीख पुन्हा बदलण्यात आली. अखेर २८ सप्टेंबरला अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com