सुपरस्टार सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी नवे अपडेट समोर आले आहे. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तपास सध्या सुरू आहे. याप्रकरणी आता नवी मुंबई पोलिसांनी आणखी ४ शूटर्सना अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेले हे चार आरोपी बिष्णोई गँगसंबंधित असून यांचा संबंध थेट पाकिस्तानातून आहे.
सलमान खानच्या घरावर दोन अज्ञातांनी १४ एप्रिलला पहाटे वांद्रातील गॅलेक्सी अपार्टमेंटवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ जणांना अटक केली असून चंदीगढ पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिश्नोई गँगच्या ३ सदस्यांनाही अटक केली आहे. सध्या मुंबई पोलिस या घटनेचा तपास आणखी वेगवान पद्धतीने करीत असून आता पनवेल पोलिसांनीही आणखी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलिसांनी पकडलेल्या आरोपींचे पाकिस्तान कनेक्शन आहे. सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधील शस्त्र पुरवठा करणाऱ्याकडून शस्त्रे मागवण्याचा प्रयत्न केला होता. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना आणि झिशान खान उर्फ जावेद खान अशी चार अटकेत आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करण्यापूर्वी चौघांनी सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊस आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची रेकी केली होती, असे समजते. पनवेलच्या फार्म हाऊसवर हल्ला करण्याची योजना त्यांनी आधी आखली होती. लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार यांनी सलमान खानवर हल्ल्याचा कट रचण्यासाठी AK-47, M-16, AK-92 यांसारखी स्वयंचलित हत्यारं पाकिस्तानी शस्त्र पुरवठा करणाऱ्याकडून शस्त्रे मिळवण्याची योजना आखली होती. पोलिसांना तपासामध्ये आरोपींच्या मोबाईलमधून अनेक व्हिडीओही सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कटामध्ये सलमान खानची गाडी थांबवणे किंवा फार्महाऊसवर हल्ला करणे हा त्यांचा उद्देश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.