Prabha Shivnekar Passed Away : 'गाढवाचं लग्न' मधील गंगी काळाच्या पडद्याआड, मराठी रंगभूमीवर कोसळला दु:खाचा डोंगर

Prabha Shivnekar Dies : मराठी लोकरंगभूमीवरील सुप्रसिद्ध तमाशा कलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन झाले आहे.
Prabha Shivnekar Passed Away : 'गाढवाचं लग्न' मधील गंगी काळाच्या पडद्याआड, मराठी रंगभूमीवर कोसळला दु:खाचा डोंगर
Prabha Shivnekar DiesSaam Tv
Published On

मराठी नाट्यसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी लोकरंगभूमीवरील सुप्रसिद्ध तमाशा कलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी पिंपरी चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आणि दमदार संवादफेकीच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनात त्यांनी घर निर्माण केले आहे.

Prabha Shivnekar Passed Away : 'गाढवाचं लग्न' मधील गंगी काळाच्या पडद्याआड, मराठी रंगभूमीवर कोसळला दु:खाचा डोंगर
Mr. And Miss Mahi Day 1 Collection : 'मिस्टर अँड मिसेस माही'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमाईमध्ये मारला षटकार

प्रभा शिवणेकर यांच्यावर मुळशी तालुक्यातील भालगुडी या जन्मगावी शुक्रवारी (३१ मे) अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रभा शिवणेकर यांना मराठी रंगभूमीवर गाढवाचं लग्न आणि झाशीची राणी या नाटकाने विशेष प्रसिद्धी दिली. गाढवाचं लग्न नाटकातील गंगी हे पात्र त्यांनी विशेष गाजवलं. प्रभा शिवणेकर मराठी लोकनाट्यसृष्टीमध्ये आणि रंगभूमीमध्ये तब्बल ७ दशकं सक्रिय होत्या. त्यांनी अनेक प्रसिद्ध तमाशा फडात काम केलेलं होतं.

Prabha Shivnekar Passed Away : 'गाढवाचं लग्न' मधील गंगी काळाच्या पडद्याआड, मराठी रंगभूमीवर कोसळला दु:खाचा डोंगर
Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ५' मधून महेश मांजरेकरांनी बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?, स्वत:च केला खुलासा

त्यांच्या अभियाची चर्चा फक्त राज्यात आणि देशातच नाही तर परदेशातही होती. जपान आणि अमेरिकेतले कलावंत प्रभा शिवणेकर यांना 'भारताच्या पॉलिमुनी' नावानेच ओळखायचे. १९५० ते ८० च्या दशकातील 'गाढवाचं लग्न' नाटकातील वगनाट्यातील गंगीच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.

Prabha Shivnekar Passed Away : 'गाढवाचं लग्न' मधील गंगी काळाच्या पडद्याआड, मराठी रंगभूमीवर कोसळला दु:खाचा डोंगर
Sant Dnyaneshwaranchi Muktaai : संत मुक्ताबाईंची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर येणार, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा प्रोमो रिलीज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com