Mr. And Miss Mahi Day 1 Collection : 'मिस्टर अँड मिसेस माही'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमाईमध्ये मारला षटकार

Mr. And Miss Mahi Day 1 Box Office Collection : राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' थिएटरमध्ये रिलीज झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून थिएटर्समध्ये दमदार प्रतिसाद मिळत आहे.
Mr. And Miss Mahi Day 1 Collection : 'मिस्टर अँड मिसेस माही'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमाईमध्ये मारला षटकार
Mr And Mrs Mahi PosterSaam Tv

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमान्स या कथेवर आधारित असून चित्रपटाला थिएटरमध्ये दमदार प्रतिसाद मिळत आहे. क्रिकेटवर आधारित या कथानकात एक लव्हस्टोरी दाखवली आहे. ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड भावली असून पहिल्याच दिवशी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे.

Mr. And Miss Mahi Day 1 Collection : 'मिस्टर अँड मिसेस माही'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमाईमध्ये मारला षटकार
Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ५' मधून महेश मांजरेकरांनी बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?, स्वत:च केला खुलासा

ट्रेड ॲनालिस्ट सॅकल्निकने चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा आकडा शेअर केलेला आहे. सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'मिस्टर अँड मिसेस माही'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७ कोटी रुपये कमवले आहेत. या कमाईमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाचे जोरदार कौतुक होत आहे. विशेषतः राजकुमार आणि जान्हवीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी होती.

चित्रपटाची ओपनिंग खूपच दमदार झाली आहे. वास्तविक, चित्रपटाने रिलीजपूर्वीच प्री- बुकिंगमध्ये दमदार कलेक्शन केले आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या चित्रपटाने 2024 मध्ये रिलीज झालेल्या 'फाइटर', 'बडे मियाँ छोटे मियाँ'सह अनेक बिगबजेट चित्रपटांचा प्री-बुकिंगमध्ये कलेक्शनचा विक्रम मोडला आहे. खरंतर काल (३१ मे) 'सिनेमा लव्हर्स डे' होता. या डेचा निर्मात्यांना फार मोठा फायदा झाला आहे. चित्रपटाला विकेंडला अर्थात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी आणखी उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Mr. And Miss Mahi Day 1 Collection : 'मिस्टर अँड मिसेस माही'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमाईमध्ये मारला षटकार
Sant Dnyaneshwaranchi Muktaai : संत मुक्ताबाईंची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर येणार, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा प्रोमो रिलीज

'मिस्टर अँड मिसेस माही'चे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेत क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या कपलची स्टोरी दाखवली आहे. हा चित्रपट एक अयशस्वी क्रिकेटर आपल्या पत्नीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यास कशी मदत करतो यावर आधारित आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसह प्रमुख भूमिकेत कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी, जरीना वहाब आणि राजेश शर्मा सारखे अनेक कलाकार आहेत.

Mr. And Miss Mahi Day 1 Collection : 'मिस्टर अँड मिसेस माही'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमाईमध्ये मारला षटकार
Malaika Arora and Arjun Kapoor's Breakup : अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचं ब्रेकअप? ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी घेतला मोठा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com