Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ५' मधून महेश मांजरेकरांनी बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?, स्वत:च केला खुलासा

Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss Marathi : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'बिग बॉस मराठी ५' का सोडला ?, त्या मागील कारण काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं एका मुलाखतीमध्ये त्यांनी दिले आहे.
Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ५' मधून महेश मांजरेकरांनी बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?, स्वत:च केला खुलासा
Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss MarathiSaam Tv

लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला शो म्हणजे, 'बिग बॉस'. खरंतर 'बिग बॉस' हा रिॲलिटी टेलिव्हिजन शो आता हिंदीसोबतच इतर प्रादेशिक भाषेतही तितकाच चर्चेत राहिलेला शो ठरलेला आहे. 'बिग बॉस मराठी'नेही प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंदी मिळवली आहे.

मराठी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये, 'बिग बॉस मराठी'चे एकूण चार सीझन आले आहेत. या शोचं होस्टिंग अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस मराठी ५'चा प्रोमो रिलीज झाला होता.

यामध्ये होस्ट म्हणून अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे. नुकतेच अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी शो का सोडला ?, त्या मागील कारण काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वत: दिले आहे.

Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ५' मधून महेश मांजरेकरांनी बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?, स्वत:च केला खुलासा
Sant Dnyaneshwaranchi Muktaai : संत मुक्ताबाईंची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर येणार, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा प्रोमो रिलीज

नुकतंच एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे. जेव्हा 'बिग बॉस मराठी ५'चा प्रोमो रिलीज झाला तेव्हापासून अनेक चाहत्यांना या प्रश्नाचं उत्तर पडलेलं होतं. महेश मांजरेकरांनी सांगितलं की, "सध्या मी दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'ठग लाईफ' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. त्यासोबतच माझ्याकडे आणखी एक कन्नड चित्रपटही आहे. त्यामुळे मी दिल्ली,लंडन आणि बँकॉकमध्ये शुटिंगसाठी धावपळ करतोय. आता या गोष्टीला किमान दोन ते तीन महिने तरी लागतीलच. यामुळे मी सध्या तरी बाहेरच आहे. या व्यतिरिक्त मनात बाकी विषयांचाही विचार सुरू आहे. हे काम संपल्यावर मला माझ्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे."

Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ५' मधून महेश मांजरेकरांनी बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?, स्वत:च केला खुलासा
Malaika Arora and Arjun Kapoor's Breakup : अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचं ब्रेकअप? ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी घेतला मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ५' साठी उत्सुक होते. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला होता. तेव्हापासून चाहत्यांना शोबद्दल उत्सुकता आहे. अद्याप निर्मात्यांनी या शोची रिलीज डेट जाहीर केली नाही. चाहत्यांना शोमध्ये कोणकोण सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार याची उत्सुकता आहे.

Mahesh Manjrekar Dropped Out Of Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी ५' मधून महेश मांजरेकरांनी बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?, स्वत:च केला खुलासा
Sangharsh Yoddha Trailer : मनोज जरांगेंच्या "संघर्षयोद्धा"चा ट्रेलर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com