Raj Kummar Rao: राजकुमार राव होणार ‘नॅशनल आयकॉन’, निवडणूक आयोगाने दिली महत्वाची जबाबदारी

Raj Kummar Rao News: भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार राव ह्याची निवडणूकीच्या ‘नॅशनल आयकॉन’पदी निवड करणार आहेत.
Rajkummar Rao Appoint As Election Commission Of India's  National Icon
Rajkummar Rao Appoint As Election Commission Of India's National IconInstagram

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लवकरच भारतीय निवडणूक आयोगाकडून अभिनेता राजकुमार राव याची ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून निवड केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्या, २६ ऑक्टोबर रोजी औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajkummar Rao Appoint As Election Commission Of India's  National Icon
Kangana Ranaut: 'हमास आधुनिक रावण, लवकरच पराभव होईल', कंगना रनौतने इस्राइल दूतावासाला भेट देत दिला पाठिंबा

दरम्यान, अभिनेत्याची ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून निवड देशामध्ये ५ राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या आधीच करणार असल्याची माहिती आयोगाने दिली. अभिनेत्यावर ही जबाबदारी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. याविषयीची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ही घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राजकुमार रावसाठी ही फार मोठी संधी असून सध्या त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये एकूण पाच राज्यांच्या निवडणूक आहेत. त्यामध्ये मिझोराम, छत्तीसगढ, तेलंगणा, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. उद्या म्हणजेच, २६ ऑक्टोबर रोजी औपचारिक घोषणा करण्यात येईल. कार्यक्रम दरम्यान, त्याच्या नावाची घोषणा केली जाणार असून त्याचा गौरव सुद्धा केला जाणार आहे. (Entertainment News)

Rajkummar Rao Appoint As Election Commission Of India's  National Icon
Ranbir Kapoor Take Break: रणबीर कपूर घेणार अभिनयातून ब्रेक, स्वत: अभिनेत्याने केला मोठा खुलासा

राजकुमार रावच्या कामाबद्दल सांगायचे तर, त्याचे फार क्वचितच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. न्यूटन, शादी मैं जरुर आना, स्त्री, बधाई दो, भेडिया, भीड सह अनेक चित्रपटांतून त्याला प्रसिद्धी मिळाली. (Bollywood Film)

Rajkummar Rao Appoint As Election Commission Of India's  National Icon
Shastri Viruddh Shastri Trailer Out: 'शास्त्री विरुध्द शास्त्री'चा ट्रेलर रिलीज, आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याची अनोखी कहाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com