Kangana Ranaut: 'हमास आधुनिक रावण, लवकरच पराभव होईल', कंगना रनौतने इस्राइल दूतावासाला भेट देत दिला पाठिंबा

Kangan Ranaut Visit Israel Embassy: आज अभिनेत्री कंगना रानौतने दिल्लीतील इस्राइलच्या दूतावासाला भेट दिली. इस्राइलच्या राजदूतांसोबत कंगनाने संवाद साधला.
Kangana Ranaut
Kangana RanautSaam Tv
Published On

Kangana Ranaut On Israel-Hamas War:

बॉलिवूडची (Bollywood) 'कॉन्ट्रव्हर्सि क्वीन' अर्थात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून असो वा माध्यमांशी संवाद साधताना असो कंगना नेहमीच स्पष्टपणे आपले मत मांडत असते. यामुळे ती अनेकदा ट्रोल देखील होते.

सामाजिक असो किंवा राजकीय प्रत्येक विषयांवर ती उघडपणे व्यक्त होते. जगभरामध्ये सध्या इस्राइल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचीच चर्चा सुरू आहे. अशामध्ये कंगना रनौतने इस्राइलला पाठिंबा दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, आज अभिनेत्री कंगना रानौतने दिल्लीतील इस्राइलच्या दूतावासाला भेट दिली. इस्राइलच्या राजदूतांसोबत कंगनाने संवाद साधला. इस्राइल-पॅलेस्टाइनच्या युद्धात इस्राइलला समर्थन असल्याचं यावेळी कंगनाने जाहीर केले. हमासच्या दहशतवादी कृत्यांचा कंगनाने निषेध केला. त्याचप्रमाणे तिने इस्लामिक दहशतवादाला विरोध असल्याचं देखील स्पष्टपणे सांगितले.

कंगनाने रनौतने इस्राइलच्या राजदूताची भेट घेतल्याचे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर आणि इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फो शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, आज संपूर्ण जग विशेषत: इस्राइल आणि भारत दहशतवादाविरुद्ध युद्ध लढत आहेत. काल जेव्हा मी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यासाठी दिल्लीमध्ये पोहचली तेव्हा मला वाटले की इस्राइल दूतावासात यावे आणि आजच्या आधुनिक रावणाला आणि हमाससारख्या दहशतवाद्यांना पराभूत करणाऱ्या लोकांना भेटावे.'

Kangana Ranaut
Ranbir Kapoor Take Break: रणबीर कपूर घेणार अभिनयातून ब्रेक, स्वत: अभिनेत्याने केला मोठा खुलासा

तसंच, कंगना पुढे असं म्हणाली की, लहान मुलं आणि महिलांना ज्याप्रकारे लक्ष्य केलं जात आहे ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे. दहशतवादाविरूद्धच्या या युद्धात इस्राइलचा विजय होईल. अशी आशा मला आहे. त्याच्यासोबत मी माझा आगामी चित्रपट 'तेजस' आणि भारताचे स्वावलंबी लढाऊ विमान तेजस याविषयी चर्चा केली.'

कंगना रनौतचे इस्राइल दूतावासाला भेट दिल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगना रनौतने इस्राइलला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. अभिनेत्रीने हमासच्या लोकांना दहशतवादी असे म्हटले होते. कंगना रनौत सध्या तिच्या तेजस चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kangana Ranaut
Raj Kundra: जेलमध्ये असताना माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता पण..., राज कुंद्राने सांगितला 'तो' कठीण प्रसंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com