Shreya Maskar
वीकेंड ट्रिपला छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) आला असाल तर वेरूळची लेणी पाहायला अजिबात विसरू नका. हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जवळील वेरूळ (एलोरा) लेणी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून ६ व्या ते १० व्या शतकातील राष्ट्रकूटकालीन स्थापत्यकलेचा एक प्रमुख ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय वारसा आहे
३४ लेण्यांच्या या समूहात हिंदू (१३-२९), बौद्ध (१-१२) आणि जैन (३०-३४) धर्मांची लेणी असून, त्यातील एकाच पाषाणातून कोरलेले भव्य कैलास मंदिर (गुहा १६) हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
वेरूळ लेण्यांजवळ असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे बारावे ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. लाल दगडांचे आणि दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे.
हिवाळ्यात वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. कुटुंबासोबत येथे नक्की ट्रिप प्लान करा. सुंदर शिल्पकला आणि वास्तुकला पाहून लहान मुल भारावून जातील.
छत्रपती संभाजीनगर जवळ दौलताबाद किल्ला (देवगिरी), बीबी का मकबरा आणि अजिंठा लेणी ही पर्यटन स्थळे आहेत.
येथे तुम्ही सुंदर फोटो काढू शकता. मुलांना प्राचीन कला आणि शिल्पे जवळून पाहायला मिळतील. तसेच येथे निवांत शांतता अनुभवता येईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.