Anant Ambani And Radhika Merchant Wedding Guest List Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant Ambani Wedding Guest : अनंत-राधिकाच्या लग्नासाठी 'या' विदेशी पाहुण्यांना निमंत्रण; अंबानींनी केलीये खास विमानाची व्यवस्था

Anant Ambani And Radhika Merchant Wedding : मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी हॉलिवूड- बॉलिवूडपासून ते राजकीय नेते आणि उद्योग क्षेत्रासह क्रिडा जगतातील दिग्गजांना निमंत्रण पाठवले आहे.

Chetan Bodke

गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित अनंत- राधिका यांच्या लग्नसोहळ्याची जोरदार पद्धतीने चर्चा सुरू आहे. हा लग्नसोहळा मुंबईमध्ये, येत्या १२ जुलै रोजी पार पडणार आहे. या लग्नाची चर्चा फक्त देशातच नाही तर, अख्ख्या जगभरात सुरु आहे.

गेल्या वर्षभरापासून हा अनोखा विवाहसोहळा सुरू आहे. वर्षभरापूर्वी जोरदार पद्धतीने साखरपुडा आणि सहा महिन्यापूर्वी दोन प्री- वेडिंग या कार्यक्रमातील राजेशाही थाटामुळे अंबानी कुटुंबीय चर्चेत आहेत.

या ग्रँड वेडिंग इव्हेंटसाठी मंत्रित केलेल्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी बॉलिवूडपासून ते राजकीय नेते आणि उद्योग क्षेत्रासह क्रिडा जगतातील दिग्गजांना निमंत्रण पाठवले आहे. याशिवाय विदेशातून अंबानींचे खास पाहुणेही या लग्नात सहभागी होणार आहेत.

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीजच नाही तर राज्यातील प्रमुख नेते मंडळींनाही लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. अनंत- राधिका यांना आशीर्वाद देण्यासाठी ठाकरे कुटुंबीयशिवाय (Thackeray Family) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय अंबानी कुटुंबाकडून सर्व पक्षाच्या दिग्गज नेत्यांनाही लग्नाचं निमंत्रणं पाठवण्यात आले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूड, बिझनेस सेक्टर, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा समावेश आहे. जर आपण राधिका- अनंत यांच्या लग्नामध्ये सामील होणाऱ्या परदेशी पाहुण्यांची यादी पाहिली, तर यामध्ये दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम, कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेक, अमेरिकन गायिका लाना डेल रे (Lana Del Rey) आणि ॲडेल (Adele) हे लग्नासाठी मुंबईमध्ये येणार आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, अंबानींच्या मॅनेजमेंटकडून अमेरिकन रिॲलिटी स्टार किम कार्दशियनचा मेकअप आर्टिस्ट, मारियो डेडिव्हानोविक, यूएस टिकटॉकर आणि कंटेंट क्रिएटर ज्युलिया चाफे आणि हेअर स्टायलिस्ट क्रिस ॲपलटन यांनाही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या लग्नातील पाहुण्यांच्या यादीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. यामध्ये, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रणवीर सिंह यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी या ग्रँड वेडिंगला उपस्थित राहणार आहेत.

या ग्रँड वेडिंग इव्हेंटचे अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी मुकेश अंबानी यांनी लॉस एंजेलिस येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि कॅमेरा पर्सन यांना बोलावलं आहे. एवढेच नाही तर अंबानींनी आमंत्रित केलेल्या परदेशी पाहुण्यांना प्रायव्हेट जेटचीही व्यवस्था केलेली आहे. दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी शुभ मुहूर्तावर ठीक दुपारी ३ वाजता मुंबईमध्ये पार पडणार आहे. तर, १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ पार पडेल. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर, १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लग्नाच्या ह्या तिनही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी अंबानी कुटुंबीयांनी खास ड्रेस कोड ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT