CM Eknath Shinde On Reservation: मराठा, ओबीसी आरक्षणावर सरकारची भूमिका काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात....

CM Eknath Shinde On Maratha Reservation/OBC Reservation: ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
CM Eknath Shinde: मराठा, ओबीसी आरक्षणावर सरकारची भूमिका काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात....
CM Eknath Shinde Saam Digital

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पु्न्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. १३ जुलैपर्यंत आरक्षणासंबंधी सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलनाची आणि राजकीय दिशा ठरवली जाईल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सरकारची आधीपासूनच भूमिका राहिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगें पाटील पुण्यात ज्या रोस कोर्स मैदानावर नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या मैदानावर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर सभा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील अंतरवाली सराटी येथे काल पुणे जिल्हा मराठा समाजाची बैठक पार पडली . या बैठकीत रेस कोर्सच्या मैदानावर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकाने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सगसोयरेची अंमलबजावणी आणि ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांना विचारलं असता, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सरकारची आधीपासूनच भूमिका राहिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

CM Eknath Shinde: मराठा, ओबीसी आरक्षणावर सरकारची भूमिका काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात....
Beed News : शिवारात खुरपणीचं काम करताना कोसळली वीज; 3 महिला जागीच ठार, तर एक गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com