Alia Bhatt Alfa Movie : आलिया भट्ट पहिल्यांदाच दिसणार अनोख्या अवतरात; 'अल्फा'तील भूमिकेसाठी घेतली ४ महिन्यांची ट्रेनिंग

Alia Bhatt Trained For Four Months Role In Alpha : हेरगिरीवर आधारित असलेल्या 'अल्फा' चित्रपटातून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील अनोख्या भूमिकेसाठी आलियाने विशेष ट्रेनिंग घेतली आहे.
Alia Bhatt Alpha Movie
Alia Bhatt Trained For Four Months Role In AlphaInstagram

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कायमच चर्चेत असते. आलिया भट्टची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोविंग आहे. कायमच वेगवेगळ्या भूमिकेंमुळे चर्चेत राहणारी आलिया लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेरगिरीवर आधारित असलेल्या 'अल्फा' चित्रपटातून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील अनोख्या भूमिकेसाठी आलियाने विशेष ट्रेनिंग घेतली आहे.

Alia Bhatt Alpha Movie
Ulajh Posters Released : जान्हवी कपूर दिसणार IFS ऑफिसरच्या भूमिकेत, 'उलझ'चा नवा पोस्टर रिलीज

मिडिया रिपोर्टनुसार, आलिया सुद्धा चित्रपटामध्ये, गुप्तहेराच्याच भुमिकेमध्ये दिसणार आहे. भूमिकेसाठी आलियाने ४ महिन्यांची ट्रेनिंग घेतली आहे. केव्हाही न पाहिलेल्या भूमिकेत आलिया दिसणार आहे, त्यामुळे तिने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या शुटिंगला ५ जुलैपासून सुरूवात झालेली असून या चित्रपटामध्ये, आलियासोबत बॉबी देओल आणि शर्वरी वाघही एकत्रित स्क्रीन शेअर करणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या टायटलची घोषणा केली होती. 'अल्फा' चित्रपट हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हेरगिरीवर आधारित चित्रपट आहे. शिव रवैल दिग्दर्शित 'अल्फा' ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाची शुटिंग सातत्याने सुरू आहे.

आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची शूटिंग ५ जुलैपासून सुरूवात झाली आहे. आलिया भट्टबद्दल सांगायचं तर, ती शेवटची 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' चित्रपटामध्ये दिसली होती. तर लवकरच आलिया रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय तिचे अनेक चित्रपटही प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

Alia Bhatt Alpha Movie
Kim Kardashian Mumbai Auto Rickshaw : अनंत अंबानींच्या लग्नाला आलेल्या पाहुणीचा अजब हट्ट; किम कार्दशियनच्या मागणीमुळे प्रशासनाची तारांबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com