Money Scam : टोरेसनंतर दादरमध्ये आणखी एक घोटाळा, १५० जणांना कोट्यवधींना गंडवले, वाचा नेमकं प्रकरण काय?

Mumbai Dadar Money Investment Scam : दादरमधील निओग्रीन व्हेंचर प्रा. लि. कंपनीने १५० गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणुक केली आहे. ५० टक्के परताव्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याची तक्रार शिवाजी पार्क पोलिसांत दाखल.
Mumbai Dadar Money Investment Scam
Mumbai Dadar Money Investment ScamSaam Tv
Published On
Summary
  • दादरमधील निओग्रीन व्हेंचर कंपनीवर फसवणुकीचे आरोप

  • १५० गुंतवणूकदारांची सुमारे १० कोटी रुपयांची फसवणूक

  • ५० टक्के परताव्याचे आमिष दाखवून पैसे उकळले

  • शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार दाखल

Mumbai Dadar Kohinoor Square Neogreen Venture Company वर्षभरापूर्वी मुंबईतील नावाजलेल्या दादर परिसरातील टोरेस नावाच्या कंपनीने हजारो लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला. याप्रकरणाची पायमुळे थेट परदेशात असल्याचे पाहायला मिळाले. ही घटना ताजी असतानाच दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये कार्यालय असलेल्या निओग्रीन व्हेंचर प्रा. लि. कंपनीने गुंतवणुकीच्या नावाने १५० जणांची १० कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आरती कौस्तुभ ठाकरे या कांदिवलीत नोकरीला आहेत. त्यांच्या पतीचा मित्र राहुल जोशी हा निओग्रीन कंपनीत सेल्स मॅनेजर होता. त्याने कौस्तुभ यांना कंपनीच्या गुंतवणूक योजनेबाबत माहिती दिली. पाच वर्षांसाठी कंपनीत पाच लाख रुपये गुंतवल्यास साडेबारा लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवले.

Mumbai Dadar Money Investment Scam
Gadchiroli : धक्कादायक! सरकारी रूग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबियांचा डॉक्टरांवर आरोप, गडचिरोलीत नेमकं काय झालं?

आरती आणि कौस्तुभ यांनी कंपनीच्या ऑफिसला भेट दिली. यावेळेस फडतरे आणि शेलार यांनी कंपनी मोरिंगा पावडरचे उत्पादन घेते, तो माल परदेशात एक्सपोर्ट केला जातो, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गुंतवणूकदारांना व्याज दिले जाते, असे सांगितले. फडतरे आणि शेलार यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठाकरे दाम्पत्याने पाच वर्षांच्या गुंतवणुकीत ५० टक्के वार्षिक परतावा योजनेंतर्गत गुंतवणुकीसाठी होकार दिला. त्यानंतर त्यांनी सहा लाख रुपये गुंतवले. तर, आरती यांच्या आई दीपाली सापळे यांनी २ लाख गुंतवले. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यांपर्यंत आरती यांना पावणेदोन लाख रुपये मिळाले.

Mumbai Dadar Money Investment Scam
Railway News : वेळ संपली, काम बंद! ड्युटी संपल्यानंतर लोको पायलटने ट्रेन थांबवली अन् निघून गेला, ३ तास प्रवाशांचा खोळंबा

त्यानंतर फडतरे व त्यांची कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली. वारंवार पाठपुरावा करून आरती यांनी काही रक्कम परत मिळवली. कंपनी संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले. रक्कम न मिळाल्याने आरती यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये गुगलवर कंपनी फ्रॉड असल्याबाबत रिव्ह्यू दिला. त्यानंतर अनेक व्यक्तींनी देखील कंपनी ही फ्रॉड असल्याबाबत मत नोंदवले. या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलीस आता काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com