Antilia House Shi Shakti Pooja : लग्नापूर्वी झाली अँटिलीयामध्ये शिवशक्ती पूजा, सोहळ्यामध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं

Anant Ambani Radhika Merchant Wedding : लग्नाच्या आदल्या दिवशी अंबानी कुटुंबीयांच्या घरी म्हणजेच अँटिलीयामध्ये शिवशक्ती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याशिवाय गरबा नाईट आणि मेहंदी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
Antilia House Shi Shakti Pooja : लग्नापूर्वी झाली अँटिलीयामध्ये शिवशक्ती पूजा, सोहळ्यामध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं
Anant Ambani Radhika Merchant WeddingGoogle

अनंत राधिका येत्या १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नासाठी आता अवघे काही तासंच शिल्लक राहिले आहेत. या ग्रँड पद्धतीच्या लग्नासाठी गेल्या काही महिन्यांपासून जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. ग्रँड सोहळ्यासाठी जगभरातील पाहुण्यांची मंदियाळी पाहायला मिळणार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी अंबानी कुटुंबीयांच्या घरी म्हणजेच अँटिलीयामध्ये शिवशक्ती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याशिवाय गरबा नाईट आणि मेहंदी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.

Antilia House Shi Shakti Pooja : लग्नापूर्वी झाली अँटिलीयामध्ये शिवशक्ती पूजा, सोहळ्यामध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं
Mahadev Betting App Case : अभिनेता साहिल खानला न्यायालयाकडून जामीन मंजूर, कोणत्या कारणामुळे मिळाली सुटका ?

शिवशक्ती पूजेसाठी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गायकांनी उपस्थिती लावली होती. आपल्या दमदार आवजाच्या माध्यमातून त्यांनी सर्वच उपस्थितांना भुरळ पाडली आहे. संगीतकार आणि गायक अमित त्रिवेदी याने इव्हेंटमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला होता. यावेळी त्याने 'केदारनाथ' चित्रपटातील 'नमो नमो' गाणं गायलं. यावेळी अमितच्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शिवशक्ती पूजेदरम्यान अनंत अंबानी यांनी कुर्ता- पायजमा कॅरी केलेला होता.

अमित त्रिवेदी गाणं गात असताना, अनंत अंबानी शिवलिंगाची पुजा करीत होते. शिवशक्ती पूजेशिवाय, गरबा नाईट आणि मेहंदी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनीही उपस्थिती लावली होती. नेहमी प्रमाणेच स्टायलिश अंदाजात उपस्थिती त्यांनी लावली होती. यावेळी, संजय दत्त, रणवीर सिंह, शनाया कपूर, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, दिग्दर्शक ॲटली, मानुषी छिल्लरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

Antilia House Shi Shakti Pooja : लग्नापूर्वी झाली अँटिलीयामध्ये शिवशक्ती पूजा, सोहळ्यामध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं
Snake in Bigg Boss House: बिग बॉसच्या घरात लांबलचक साप; घरातील स्पर्धकांचा जीव धोक्यात, पाहा VIDEO

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी शुभ मुहूर्तावर ठीक दुपारी ३ वाजता मुंबईमध्ये पार पडणार आहे. तर, १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ पार पडेल. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर, १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या रिसेप्शन सोहळ्याला फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, बिझनेसमन आणि प्रमुख राजकीय मंडळींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

Antilia House Shi Shakti Pooja : लग्नापूर्वी झाली अँटिलीयामध्ये शिवशक्ती पूजा, सोहळ्यामध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं
Tauba Tauba Song : कतरिना कैफला विकीचा 'तौबा तौबा' कसा वाटला? म्हणाला, "ती मला बाराती डान्सर समजायची..."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com