महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. साहिलला न्यायालयाकडून ७० दिवसांसाठी जामिन मिळाला आहे. या प्रकरणी अभिनेत्याला २८ एप्रिलला छत्तीसगढमधून अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्याला तपासासाठी मुंबईला आणण्यात आलं होतं. आता अभिनेत्याला अखेर जामीन मिळाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यातच अभिनेत्याला या प्रकरणी 70 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. कारण, त्याच्याविरोधात प्राथमिक दृष्ट्या कोणताही गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही.
अभिनेता साहिल खानला एप्रिल २०२४ मध्ये महादेव बेटिंग ॲप प्रकरणी लायन बुक वेबसाईटची जाहिरात केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्या ॲपचे ज्यांनी जाहिरात केली त्यांच्यापैकी कोणाचेही नाव एफआयआरमध्ये नाही किंवा त्यांना अटक केलेली नाही. हे सर्व आरोप केवळ अनुमानाच्या आधारेच करण्यात आले असून त्यांना पुराव्याचा आधार नाही, असं साहिलचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात सांगितलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सत्र न्यायालयाने अभिनेत्यावर प्रथमदर्शनी कोणताही खटला चालवला नसल्याचे सांगितल्यानंतर अभिनेत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. बहुतांश आरोप हे केवळ अनुमानाच्या आधारे करण्यात आले असून त्यांना पुराव्यांचा आधार नाही, असेही वकीलांनी सांगितले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने साहिल खानचा सादर केलेला युक्तिवाद मान्य केला. एफआयआरमध्ये आरोप केलेल्या गुन्ह्यांचा प्रथमदर्शनी खटला स्थापित करण्यासाठी तपास यंत्रणेने अभिनेत्याविरूद्ध कोणतेही ठोस पुरावे गोळा केलेले नाहीत.
मिडिया रिपोर्टनुसा, अभिनेता साहिल खान अटक टाळण्यासाठी चार दिवसांमध्ये पाच राज्यांमध्ये प्रवास केला होता. प्रवासादरम्यान अभिनेत्याने आपला वेश बदलून आणि स्वत:ची ओळख लपवून ठेवली होती. परंतु अखेर २८ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील जगदलपूर येथील हॉटेलमधून त्याला पकडण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.