Tauba Tauba Song : कतरिना कैफला विकीचा 'तौबा तौबा' कसा वाटला? म्हणाला, "ती मला बाराती डान्सर समजायची..."

Vicky Kaushal Reveals Katrina Loved Expressions : विकीच्या 'तौबा तौबा' गाण्यातल्या डान्स मुव्हजची अख्ख्या बॉलिवूडला भुरळ पडली असताना आता कतरिना कैफला सुद्धा डान्स मुव्हजची पडली आहे.
Bad News Movie
Vicky Kaushal Reveals Katrina Kaif Loved ExpressionsSaam Tv

विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला होता. त्यानंतर 'तौबा तौबा' हे गाणंही रिलीज झालं. सध्या ह्या गाण्याच्या हूक स्टेप्सची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. विकीच्या डान्स मुव्हजचे कौतुक अख्ख्या बॉलिवूडने केले आहे. अशातच 'तौबा तौबा' गाण्याची भुरळ विकीची बायको म्हणजेच कतरिनाला (Katrina Kaif) सुद्धा पडली आहे. तिने गाणं पाहिल्यानंतर प्रतिक्रिया काय दिली याबद्दल विकीने सांगितली आहे.

Bad News Movie
Ye Re Ye Re Paisa 3 : 'ये रे ये रे पैसा ३'मध्ये दिसणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील कलाकार; चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

'फिल्म कम्पॅनियन'ला दिलेल्या मुलाखतीत विकीने सांगितले की, "जेव्हा माझा डान्स कतरिनाने पाहिला तेव्हाच मला फार बरं वाटलं. तिने माझ्या डान्सचं कौतुक केलं. तर तिला मी लगेचच थँक्यू म्हणालो. ती मला नेहमीच सांगते की, तिला मी डान्स करताना आवडतो. मी जेव्हा कोणतेही भान न ठेवता नाचतो, तसा डान्स तिला आवडतो. कतरिना नेहमी मला म्हणायची की तुला डान्स आवडतो माहितीये पण तू बाराती डान्सर आहेस प्रशिक्षित डान्सर नाही. पण यावेळी ती खूश आहे कारण तिला माझे हावभाव, मूव्ह्ज आणि ॲटिट्यूड खूप आवडला."

कतरिनाकडून शिकलेल्या डान्सविषयी विकी म्हणाला, "कॅमेरा रोल केल्यावर स्वत:ची एनर्जी केव्हा वाचवायची, एनर्जी कुठे लावायची, कसे एक्सप्रेशन द्यायचे हे आपल्याला कळायला हवं. मी नेहमीच डान्स खूप वेड्यासारखा करतो. मी कोणतीही गोष्ट आनंद घेऊनच करतो. पण कतरिनाला माझा डान्स आवडल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे."

Bad News Movie
Sanskruti Balgude Interview : संस्कृती बालगुडेने घेतला WhatsApp न वापरण्याचा निर्णय; कारण सांगत स्वत:च केला खुलासा

विकीचा डान्स हृतिक रोशनलाही आवडला आहे. हृतिक रोशनच्या कमेंटबद्दल विकीने सांगितले, "मी घरी जात असताना मी माझ्या डान्सच्या व्हिडिओवर हृतिक सरांची कमेंट वाचली आणि लगेचच बाजुच्या सीटवर फोन फेकला. त्यांची कमेंट वाचून मला एक वेगळाच आनंद झाला. मी यानिमित्त निर्मात्यांचे आभार मानेल कारण की, त्यांनी माझ्यातील लपलेला डान्सर बाहेर काढला आहे."

Bad News Movie
Mirzapur 4 : 'मिर्झापूर ४' केव्हा येणार ?; अली फजलने दिली हिंट, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘बॅड न्यूज’ चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली असून आनंद तिवारी यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १९ जुलै २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रोमँटिक ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत विकी कौशलशिवाय तृप्ती डिमरी, एमी विर्क, आणि नेहा धूपियाही दिसणार आहे.

Bad News Movie
Alok Nath Birthday : ६० रुपयांत करिअरची सुरूवात, आज आहेत कोट्यवधीचे मालक; अलोकनाथ यांना 'बाबूजी' का म्हटलं जातं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com