Manasvi Choudhary
हिंदू धर्मात मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. लग्न झाल्यानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात.
मंगळसूत्र हे केवळ प्रेमाचे प्रतीक नाही तर सौभाग्याचे लेणं मानले जाते. लग्नात नवरदेव आपल्या होणाऱ्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून नवीन आयुष्याची सुरूवात करतात.
विवाहित महिलेने मंगळसूत्र घालणे हे तिच्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी शुभ मानले जाते.
हिंदू धर्मात मंगळसूत्र तुटणे अशुभ मानले जाते. पतीच्या जीवनात अडचणी येण्याचे संकेत देखील मानले जाते.
मंगळसूत्रात काळे मनी असतात जे नकारात्मकता, संकटापासून संरक्षण आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते.
मंगळसूत्र हे नाजूक मण्यांमध्ये गुंफलेले असते यामुळे मणी आणि हुक्स हे नीट लागले नसेल तर ते केसांत किंवा कपड्यात अडकून तुटू शकते
शास्त्रामते, घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा घरातील व्यक्तीवर येणारे संकट मंगळसूत्र स्वतःवर घेते, ज्यामुळे ते तुटते.
मंगळसूत्र तुटल्यावर होणारा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुळशी मातेची पूजा करावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.