Masala Taak Recipe: अवघ्या १० मिनिटांत बनवा मसाला ताक, नोट करा ही रेसिपी

Manasvi Choudhary

मसाला ताक

उन्हाळा सुरू झाला की थंडगार मसाला ताक पिण्याची तलफ सर्वांनाच लागते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन, अपचन अशा समस्या उद्भवतात अशावेळी तुम्ही मसाला ताक प्या.

Masala Taak recipe

सोपी रेसिपी

मसाला ताक घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. मसाला ताक घरीच बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Masala Taak recipe

साहित्य

मसाला ताक बनवण्यासाठी दही, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, पुदिना पाने, जिरा पावडर, काळे मीठ, साधे मीठ, चाट मसाला हे साहित्य घ्या.

Masala Taak recipe

पेस्ट तयार करा

सर्वातआधी मसाला ताकसाठी मिक्सरमध्ये हिरवी मिरची, आले, पुदिना पाने आणि कोथिंबीर याची पेस्ट करा.

Masala Taak recipe

मसाले घाला

नंतर या पेस्टमघध्ये जिरा पावडर, काळे मीठ आणि साधे मीठ मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण एकत्रित करा.

Masala Taak recipe

घट्ट ताक

आता या मिश्रणात थंड पाणी घाला. जर तुम्हाला ताक जास्त घट्ट आवडत असेल तर पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवा आणि रवीने ताक छान घुसळून घ्या

Masala Taak recipe

थंडगार ताक तयार

अशाप्रकारे घरच्या घरी मसाला ताक तयार होईल नंतर ताक ग्लासमध्ये ओता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर जिरे पूड टाकून प्या.

Masala Taak recipe | Canva

NEXT: High Braided Hairstyles: स्टनिंग लूकसाठी केसांची करा हटके हेअरस्टाईल, दिसाल एकदम कूल

येथे क्लिक करा...