Manasvi Choudhary
हाय ब्रेडेड हेअरस्टाईल स्टायलिश आणि हटके लूकसाठी तुम्ही निवडू शकता. वेस्टर्न लूकवर ही हेअरस्टाईल फारच सुंदर दिसते.
हाय पोनीटेल ब्रेड ही सध्या युनिक फॅशन आहे. जीन्स टॉपवर ही स्टाईल कूल दिसते. तुमचे केस लांब असतील तर तुम्ही ही स्टाईल निवडा.
हाय पोनीटेल ब्रेडमध्ये सर्व केसांचा हाय पोनी बांधून त्याचे तीन भाग करून लांब वेणी घाला. कॉलेज किंवा ऑफिससाठी ही बेस्ट हेअरस्टाईल आहे.
हाय डच वेणी स्टाईलमध्ये कपाळापासूनचे केस वरती घेऊन त्याची एक घट्ट वेणी घाला ही हेअरस्टाईल तुम्ही जिम, वर्कआऊट किंवा ट्रॅव्हलिंगसाठी निवडू शकता.
आधी हाय पोनीटेल बांधा आणि त्याची वेणी घाला. आता ही वेणी पोनीटेलच्या भोवती गोलाकार गुंडाळून 'बन' करा.
फिशटेल हाय वेणी स्टाईलमध्ये तुम्ही पोनीचे दोन भाग करून फिशटेल पद्धतीने वेणी बांधा ही स्टाईल तुम्ही वेस्टर्न , इंडो वेस्टर्न लूकवर करू शकता.
वेणीमध्ये बारीक मोती, रंगीत रबर बँड्स किंवा सोन्याची चेन गुंफल्यास हेअर एक्सेसरीजमुळे लूक अधिक उठून दिसतो.