Surabhi Jayashree Jagdish
महाराष्ट्र-गोवा सीमेवर वसलेलं एक हिल स्टेशन शांत आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. मडगावहून याठिकाणी पोहोचायला सुमारे ३ तास लागतात. धुक्याने भरलेली दरी, उंच डोंगररांगा, धबधबे आणि हिरवळीमुळे हे छान दिसतं.
मडगावहून आंबोलीपर्यंतचं अंतर सुमारे ९०–१०० किमी आहे आणि रस्त्याने साधारण ३ तासांत याठिकाणी पोहोचता येतं. गोव्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
पावसाळ्यात संपूर्ण परिसर धुक्याने वेढलेला असतो आणि डोंगर-दऱ्यांवर हिरवळ पसरते. तर उन्हाळ्यात फिरण्यासाठीही हे सर्वात सुंदर आणि लोकप्रिय सिझन आहे.
आंबोली घाटात असलेला आंबोली वॉटरफॉल हा पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात हा धबधबा प्रचंड वेगाने वाहतो. धबधब्याच्या आसपास फोटो काढणं आणि थंड पाण्यात भिजणं पर्यटकांना खूप आवडतं.
आंबोलीतील सनसेट पॉईंट हा सूर्यास्त पाहण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटातील डोंगररांगा आणि खोल दऱ्यांचं सुंदर दृश्य दिसतं. संध्याकाळच्या वेळी लालसर सूर्य आणि धुक्याची चादर यामुळे दृश्य अधिक मोहक बनते.
आंबोली परिसर पश्चिम घाटातील घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि दुर्मिळ प्राणी आढळतात. निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा परिसर विशेष आकर्षण ठरतो.
महाबळेश्वर किंवा माथेरानसारख्या ठिकाणांच्या तुलनेत इथे कमी गर्दी असते. त्यामुळे शांत वातावरणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आंबोली उत्तम पर्याय ठरतो.