Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्त्व हे केवळ पराक्रमापुरते मर्यादित नव्हतं. तर त्यांचा वेश, दाढी-मिशा, पोशाख आणि दरबारी मांडणीही विचारपूर्वक होती. त्या काळात दाढी ठेवणं ही केवळ वैयक्तिक गरज नव्हती तर सामाजिक, सांस्कृतिक प्रतिमेचा भाग होती.
त्या काळात दाढी हे राजाचं एक चिन्ह मानलं जायचं. शत्रूवर मानसिक प्रभाव पडावा हा देखील उद्देश होता. दरबारातील उपस्थितीत व्यक्तिमत्त्व उठून दिसत असे.
मराठा आणि दख्खनातील योद्धा संस्कृतीत दाढी-मिशा प्रतिष्ठेच्या मानल्या जात. शूर सैनिक आणि सरदार दाढी ठेवत असत. राजाही त्याच परंपरेचं पालन करत होते.
हिंदू क्षत्रिय परंपरेत नैसर्गिक रूप जपण्याला मान होता. संत, गुरू आणि योद्ध्यांमध्ये दाढी सामान्य होती. सांस्कृतिक ओळख टिकवण्याचा तो एक भाग होता.
उपलब्ध चित्रांमध्ये महाराज दाढीसह दिसतात. रायगड आणि इतर ठिकाणच्या शिल्पांतही तसंच वर्णन करण्यात आलंय.
राजदरबारात ठराविक वेशभूषा पाळली जात असे. दाढी-मिशा नीट राखणं ही शिस्त मानली जायची. हे राजकीय प्रतिमेचा भाग होतं.
१७व्या शतकात दाढी ठेवणं सामान्य प्रथा होती. अनेक राजे आणि सरदार अशाच रूपात दिसतात. शिवाय हे वेश बदलण्यासाठी फायद्याचं मानलं जायचं.