Hemangi Kavi Shared Mothers Day Special Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

‘Mothers Day’ निमित्त आईने दिलेलं गिफ्ट पाहून Hemangi Kavi भावूक; विनोदी कार्यक्रमात भरून आला उर

Hemangi Kavi Shared Mothers Day Special Post : आज १२ मे, मातृदिन... मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने मातृदिनानिमित्त खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री व्हिडीओमध्ये भावूक झाली आहे.

Chetan Bodke

आज १२ मे, मातृदिन (Mother Day) मातृदिनानिमित्त सध्या सोशल मीडिया अनेक युजर्स आपल्या आईसोबत फोटो शेअर करताना दिसत आहेत. अशातच सेलिब्रिटी मंडळींनीही खास आईसाठी पोस्ट शेअर करत आपल्या आठवणी शेअर केलेल्या आहेत. नुकतंच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने मातृदिनानिमित्त खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

हेमांगीने 'मॅडनेस मचायेंगे'च्या मंचावरील व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये हेमांगी कवीची आई तिच्याबद्दल सांगताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीच्या आईने हेमांगीबद्दल अनेक गोष्टी शेअर केलेल्या आहेत. हेमांगी यावेळी भावूक झाली.

अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले की, "प्रत्येक आईचं आपल्या मुलावर प्रेम असतं. ते दाखवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील पण मुल वाढवताना ती जे जे करते ते जगात कुणीच करू शकत नाही पण जेव्हा हीच मुलं मोठी होऊन अभिनय क्षेत्रासारखी जरा हटके आणि वेगळी वाट निवडतात ना तेव्हा त्या मुलांसोबत त्या आईचा ही स्ट्रगल सुरु होतो! हा व्हिडीओ पाहताना माझ्या आईचा सगळा स्ट्रगल, तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे, घरातल्याच लोकांची पत्करलेली नाराजी, उघडउघड कधीच नाही पण नकळतपणे माझ्यात रूजवलेलं धैर्य, बळ आणि आज माझ्याबद्दल बोलताना तिचा भरून आलेला ऊर पाहून अत्यानंद झाला आणि माझा बांध फुटला!"

"(Screen वर दिसणारं सगळंच scripted नसतं!) Mother’s Day निमित्ताने आज मी तिला सरप्राईज गिफ्ट द्यायला हवं होतं. पण तिनेच 'मॅडनेस मचायेंगे'च्या ‘Mother’s Day special’ episode मध्ये हा व्हिडीओ पाठवून मला हे सरप्राईज आणि गोड गिफ्ट दिलं! या व्हिडीओसाठी मी सोनी टिव्ही आणि @optimystixmedia च्या संपुर्ण टीमचे आभार मानते! एवढ्या मोठ्या मंचावर 1st time माझी Mummy दिसणार! Yay! My mommy bestest! Happy Mother’s Day!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पुण्यात सभा

Rava Cutlet Recipe: आठवड्याच्या पहिल्या दिवशी नाश्त्याला बनवा कुरकुरीत रवा कटलेट, सोपी आहे रेसिपी

Solapur Crime: भेटायला बोलावून तरुणाने गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर स्वत:वरही केले वार; हत्याकांडाच्या घटनेने सोलापूर हादरले

Dalimba chutney Recipe : आरोग्यदायी डाळिंबाची आंबट-गोड चटणी, वाचा सोपी रेसिपी

Cold Protection: बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी 'ही' एक चूक करताय, आताच अलर्ट व्हा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT