Marathi Serial SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, दीड वर्षातच गाशा गुंडाळला

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

Shreya Maskar

'सन मराठी' वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

'कॉन्स्टेबल मंजू' ही मराठी मालिका संपली.

दीड वर्षातच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

प्रेक्षकांना जशी नवीन मालिकांची मेजवानी मिळत आहे. तसेच काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप देखील घेत आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'थोडं तुझं थोडं माझं' आणि 'आई बाबा रिटायर होत आहेत' या दोन मालिकांनंतर 'सन मराठी' वाहिनीवरील एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला (Marathi Serial Off Air ) आहे. ज्यामुळे चाहते भावुक झाले आहे.

'सन मराठी' वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिका संपली आहे. ही मालिका 2024 च्या सुरुवातीला सुरू झाली होती आणि आता 2025च्या शेवटी 'कॉन्स्टेबल मंजू'मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका अवघ्या दीड वर्षात संपली आहे. मालिकेतील कलाकारांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मालिकेचा शेवटच्या भागाच्या शूटिंगची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडू कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्री मोनिका राठी आणि अभिनेता विशाल कदम झळकला आहे. याशिवाय मालिकेत कलाविश्वातील खास कलाकार पाहायला मिळाले. ज्यात विद्या सावळे,मिलिंद जोशी, कल्याणी चौधरी, शिवराज नाळे आणि अजय तपकिरे यांसारख्या कलाकार मंडळींचा समावेश होता.

'कॉन्स्टेबल मंजू' मालिका 'सन मराठी' वाहिनीवर रात्री 8 वाजता पाहायला मिळायची. आता 'सन मराठी' वाहिनीवर नवीन कोणती मालिका सुरू होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governor of Maharashtra : आचार्य देवव्रत झाले महाराष्ट्राचे राज्यपाल, संस्कृत भाषेतून घेतली शपथ

Onion Price : दर घसरल्याने कांदा उत्पादक आक्रमक; गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

पुण्यात भाजपने गेम फिरवला, अजित पवारांना जोरदार धक्का; राष्ट्रवादीच्या ३४ नेत्यांनी कमळ हाती घेतलं

Prajakta Mali: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

SCROLL FOR NEXT