Sonarika Bhadoria Pregnant : लोकप्रिय अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला VIDEO

Sonarika Bhadoria Pregnancy Announcement : लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Sonarika Bhadoria Pregnancy Announcement
Sonarika Bhadoria PregnantSAAM TV
Published On
Summary

अभिनेत्री सोनारिका भदौरियाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

सोनारिका भदौरिया लवकरच आई होणार आहे.

बेबी बंप फ्लॉन्ट करत सोनारिकाने व्हिडीओ शेअर केला आहे.

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. 'देवों के देव… महादेव' मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनारिका भदौरियाने (Sonarika Bhadoria Pregnancy Announcement) चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोनारिका भदौरियाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. तिने नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

सोनारिका भदौरियाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती समुद्रकिनारी नवऱ्यासोबत पोज देताना दिसत आहे. तसेच तिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यात ती खूप सुंदर पद्धतीने बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोनारिकाने स्टायलिश पांढरा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्या नवऱ्याने देखील पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि पॅन्ट घातली आहे.

सोनारिकाने या पोस्टला खूप खास कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की, "आमचे आतापर्यंतचे सर्वात मोठे Adventure..." सोनारिकाच्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते आता सोनारिकाच्या बाळासाठी खूप उत्सुक आहेत.

लव्ह लाइफ

सोनारिका भदौरियाच्या नवऱ्याचे नाव विकास पराशर असे आहे. सोनारिका आणि विकासने फेब्रुवारी 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दीड वर्षांनी सोनारिका आणि विकास आई-बाबा होणार आहेत. सोनारिका भदौरियाने खूप शाही थाटात लग्न केले होते. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मीडिया रिपोर्टनुसार, सोनारिका लग्नाआधी विकासला सात वर्षे डेट करत होती. सोनारिका आणि विकासची ओळख जिममध्ये झाली.

Sonarika Bhadoria Pregnancy Announcement
Shahid Kapoor : शाहिद कपूरच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक; सोशल मीडियावर जोरदार चर्चा, रिलीजसाठी निवडला खास दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com