Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिने नुकतंच आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
अभिनेत्री सोनारिका भदोरिया आणि बॉयफ्रेंड विकास पराशर यांनी रविवारी १८ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकली.
या कपलने एकमेकांना जवळपास आठ वर्ष डेट केल्यानंतर राजस्थानच्या रणथंबोरमध्ये लग्नगाठ बांधली
नुकतंच टेलिव्हिजन अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लग्नातले खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी दोघांनीही अतिशय खास पेहराव परिधान केला होता.
लग्नासाठी सोनारिकाने लाल रंगाचा खास अंदाजातला स्कर्ट परिधान केला होता. तिचा हा ड्रेस अतिशय युनिक होता.
लग्नामध्ये सोनारिकाने भरजरी ड्रेस परिधान केला होता. त्यावर सोनेरी रंगाचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले होते. लग्नामध्ये सोनारिकाने लेहेंगा नाही तर फिश कट स्कर्ट घातला होता.
सोनारिकाचा लग्नातला अतिशय हटके पेहराव असून तिच्या सौंदर्याची चर्चा होते.
सोनारिकाच्या ब्रायडल लूकमधील सुंदर फोटो सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
सोनारिका आणि विकासच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.