Chetan Bodke
गेल्या अनेक दिवसांपासून प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नाची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.
आज अर्थात २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश आणि क्षितीजाने लग्नगाठ बांधली आहे.
प्रथमेश आणि क्षितीजाने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
नुकतंच प्रथमेशने सोशल मीडियावर लग्नातले काही फोटोज शेअर केलेले आहेत.
“अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले.” असं कॅप्शन देत त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले.
लग्नामध्ये प्रथमेश आणि क्षितीजाने खास पारंपरिक लूक केला होता.
आयुष्यातील खास क्षणी क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, त्यावर तिने गुलाबी रंगाची शाल घेतली होती.
तर, प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. तर गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही त्याने बांधला होता.
प्रथमेशच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.