Shahid Kapoor : शाहिद कपूरच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक; सोशल मीडियावर जोरदार चर्चा, रिलीजसाठी निवडला खास दिवस

Shahid Kapoor New Movie Poster : शाहिद कपूरच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात शाहिदचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे नाव आणि रिलीज डेट जाणून घेऊयात.
Shahid Kapoor New Movie Poster
Shahid KapoorSAAM TV
Published On
Summary

शाहिद कपूरच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

शाहिद कपूरचा नवीन चित्रपट 2026मध्ये एका खास तारखेला प्रदर्शित होणार आहे.

पोस्टरमध्ये शाहिदचा हटके लूक पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) कायम त्याच्या चित्रटामुळे चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्याच्या लूकचे आणि अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. नुकतेच शाहिद कपूरच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर शाहिदीच्या नवीन लूक आणि चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचे पोस्टर

शाहिद कपूरने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात शाहिद कपूरचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये शाहिद कपूर ब्लॅक सूटमध्ये दिसत आहे. डोक्यावर कॅप आणि चेहरा हात ठेवून स्टाइलमध्ये झाकलेला पाहायला मिळत आहे. चित्रपट अ‍ॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे. पोस्टरवर प्रेक्षकांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

चित्रपटाचे नाव आणि रिलीज डेट काय?

शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटाचे नाव 'ओ रोमियो' (O ROMEO) असे आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2026ला रिलीज होणार आहे. म्हणजे येणारा 'व्हॅलेंटाईन डे' खूप खास असणार आहे. 'ओ रोमियो' चित्रपट

चित्रपटाची स्टार कास्ट

'ओ रोमियो' चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत. 'ओ रोमियो'मध्ये शाहिद कपूरसोब तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच चित्रटात खूप तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी आणि फरीदा जलाल यांचा समावेश आहे. चाहते शाहिद कपूरचा नवीन अंदाज पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Shahid Kapoor New Movie Poster
Disha Patani : दिशा पटानीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, FIR मध्ये नेमकं काय आहे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com