Constable Manju: ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये तात्यासाहेबांचा दरारा; मराठमोळा अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका

Constable Manju Serial: ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेने देखील पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे.
Constable Manju Serial
Constable Manju SerialSaam Tv

Constable Manju Serial Entered Milind Shinde

मालिकेमध्ये विरोधी स्वभावाची दोन मुख्य पात्रांची गोष्ट रंगत असताना जेव्हा त्यात तिस-या पात्राची एंट्री होते ज्याचा स्वभाव आधीच्या दोन स्वभावांपेक्षा अतिशय आगळा वेगळा असतो तेव्हा मालिकेत आणखी काहीतरी रंजक, कथेशी खिळवून ठेवणा-या घटना पाहायला मिळणार अशी प्रेक्षकांची आतुरता आणि अपेक्षा असते. प्रत्येक मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवायचं, उद्याच्या भागात काय होणार याची प्रेक्षकांची कुतुहलता वाढवणं हे ‘सन मराठी’ वाहिनी अतिशय सुरेख जमतं. नुकतीच सुरु झालेल्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेने देखील पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे.  (Tv Serial)

Constable Manju Serial
TRP Rating Of Marathi Serial: टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ची बाजी, कोणत्या मालिकांचा आहे टॉप १० यादीत समावेश

१८ मार्चपासून सुरु झालेल्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत एका प्रसिध्द राजकारण्याचा कार्यकारी सत्या जो निडर, बिनधास्त आणि रावडी आहे, त्याच्या नशिबात येणार भित्री भागुबाई कॉन्स्टेबल मंजू. दोघांचेही स्वभाव एकमेंकाच्या अगदी उलट, पण नशिबाने त्यांची एकत्र गाठ बांधली जाणार आहे हे आपण प्रोमोमध्ये पाहिलंच आहे. पण आता मालिकेच्या कथेत एक नवीन ट्विस्ट येणार असून नवीन पात्राची एंट्री होणार आहे जो या दोघांपेक्षाही वेगळा आहे. (Marathi News)

Constable Manju Serial
लव्ह, अफेयर अन् कन्फ्यूजन, Do Aur Do Pyaar चा Trailer Out; दिसणार विद्या- प्रतीकची भन्नाट केमिस्ट्री

सत्या आणि मंजूच्या रणधुमाळीत आमदार तात्यासाहेब मोहिते यांचं आगमन होणार आहे आणि तात्यासाहेबांची भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे साकारत आहेत. नुकताच त्यांच्या भूमिकेचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला ज्यामध्ये प्रेक्षकांना आमदार तात्यासाहेबांचा रुबाब, दरारा आणि वेळप्रसंगी भयानक पाऊल उचलण्याचा स्वभाव पाहायला मिळेल. (Marathi Film Industry)

मिलिंद शिंदे यांनी यापूर्वी अनेक खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यांच्या एंट्रीनेच समोरच्याची दातखिळी बसेल असा खलनायकाचा अभिनय ते अगदी जबरदस्त करतात. आता त्यांच्या येण्याने सत्या आणि मंजूच्या आयुष्यात काय वादळ येणार ते पाहण्यासाठी पाहत राहा ‘कॉन्स्टेबल मंजू’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त आपल्या ‘सन मराठी’वर. (Entertainment News)

Constable Manju Serial
Sankarshan Karhade Post: ‘नाटक पाहून हसली, रडली, कौतुक करून गेली...’; ‘नियम व अटी लागू’च्या शोनंतर संकर्षण कऱ्हाडेची रिंकू राजगुरूसाठी खास पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com