TRP Rating Of Marathi Serial: टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ची बाजी, कोणत्या मालिकांचा आहे टॉप १० यादीत समावेश

Marathi Serial TRP Report: १६ मार्च ते २२ मार्च दरम्यानचं टीआरपी रेटिंग कार्ड जाहीर झालेलं आहे. जाणून घेऊया टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या टॉप १० मालिकांनी बाजी मारली आहे...
TRP Rating Of Marathi Serial
TRP Rating Of Marathi SerialSaam Tv

TRP Rating Of Marathi Tv Serial 16th March To 22 March

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सिरियल निर्मात्यांकडून (Marathi Serial) सध्या नवनवीन विषय हाताळताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना मालिकेमध्ये खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आणायला पाहत असतात. अशातच सध्या अनेक नव्या मालिका टिव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यांची चर्चा चाहत्यांमध्ये होताना सर्वाधिक मिळत आहे. मालिका म्हटलं तर, टीआरपी रेटिंग आलीच. नुकतंच १६ मार्च ते २२ मार्च दरम्यानचं टीआरपी रेटिंग कार्ड जाहीर झालेलं आहे. जाणून घेऊया टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या टॉप १० मालिकांनी बाजी मारली आहे.... (Tv Serial)

TRP Rating Of Marathi Serial
लव्ह, अफेयर अन् कन्फ्यूजन, Do Aur Do Pyaar चा Trailer Out; दिसणार विद्या- प्रतीकची भन्नाट केमिस्ट्री

हा लेटेस्ट TRP रिपोर्ट 'मराठी टेलिबझ ऑफिशियल' या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. टीआरपीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा जुई आणि अमितच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेनेच बाजी मारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेने टीआरपी यादीमध्ये आपलं पहिल्या क्रमांकावरील स्थान कायम ठेवलं आहे. तर तेजश्री प्रधानच्या‘प्रेमाची गोष्ट’मालिकेला टीआरपी चार्टमधलं आपलं स्थान गमवावं लागलं आहे. जुई आणि अमितच्या ‘ठरलं तर मग’ सिरीयलला ७.१ इतके रेटिंग्ज मिळाले आहेत.  (Star Pravah)

‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाल्यापासून मालिकेमध्ये प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर नवनवे ट्विस्ट अनुभवायला मिळत आहे. मालिकेमध्ये येणाऱ्या नवनव्या ट्विस्टमुळे टीआरपीच्या शर्यतीत टॉप १ आणि टॉप २ ला कायम राहिली. या मालिकेला जाहीर झालेल्या टीआरपी यादीमध्ये ६.८ इतकी रेटिंग मिळाली आहे. टेलिकास्ट होत असल्यापासून अनेक सिरियल्सला मागे सारत, या मालिकेने टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर स्वत:चे नाव कोरलेय. मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली असून पती-पत्नीची एक वेगळीच लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. (Zee Marathi)

TRP Rating Of Marathi Serial
Sankarshan Karhade Post: ‘नाटक पाहून हसली, रडली, कौतुक करून गेली...’; ‘नियम व अटी लागू’च्या शोनंतर संकर्षण कऱ्हाडेची रिंकू राजगुरूसाठी खास पोस्ट

टॉपच्या सिरीयलमध्ये स्टार प्रवाह सोबतच झी मराठीवरील काही सिरियल्सचा समावेश आहे. टॉपच्या यादीमध्ये लक्ष्मीच्या पावलांनी, घरोघरी मातीच्या चुली, तुझेच मी गीत गात आहे, सुखं म्हणजे नक्की काय असतं, साधी माणसं, मनं धागा धागा जोडते नवा, अबोली, कुण्या राजाची गं तु राणी, पारू, तुला शिकविनच चांगला धडा या मालिकांचा समावेश आहे. या मालिकांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. (Entertainment News)

TRP Rating Of Marathi Serial
Jackie Shroff Viral Video: सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यासोबत जग्गूदादाची मस्करी; थेट डोक्यात मारली टपली, नेटकरी म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com