Abhijeet Khandekar: 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेने निरोप घेतल्याने अभिजीत भावुक, पोस्टमधून सांगितला अडीच वर्षाचा प्रवास...

Abhijeet Khandekar Emotional Post Shared: 'तुझे मी गीत गात आहे' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याच दरम्यानची भावनिक पोस्ट अभिनेता अभिजीत खांडकेकरने लिहीली आहे. जी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय.
Entertainment News
Abhijeet KhandekarSaam Tv

टिव्ही वरील 'तुझे मी गीत गात आहे' या मालिकेने गेली दोन वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केलं. २ मे २०२२ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. फार कमी काळात या मालिकेने घराघरांतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याच दरम्यानची भावनिक पोस्ट अभिनेता अभिजीत खांडकेकरने लिहीली आहे. जी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय. (Marathi Entertainment News)

Entertainment News
Namrata Sambherao : "एकच हट्ट केला तोही पुरवला...", नम्रता संभेरावची ‘फादर्स डे’निमित्ताने भावुक पोस्ट

अभिजीतनं पोस्टमध्ये लिहलंय की, अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय…. प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं, त्यांच्या बरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एके दिवशी आता उद्याचा कॉलटाइम येणार नाही, “ ए तू किती वाजता येणार उद्या?” , “आज डब्यात तूझ्यासाठी खास आणतेय हा..”, “ च्यायला ट्राफिक लागला यार आज खूप” , “चलो चलो जल्दी घर जाना है…” हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही. आता हा चॅप्टर संपवून नवीन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायलाच वेळ लागतो…, पण आम्हा ॲक्टर्सच हे असच असतं….तरीही 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या निमित्ताने तयार झालेले हे बंध आयुष्यभरासाठी आहेत.

मालिकेतील सहकलाकारांबद्दल अभिजीतने म्हटलंय की, अवनी तायवडे , अवनी जोशी म्हणजेच स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा अनुभव दिला. कांचन गुप्ते ने आई सारखी माया दिली.सचिन, उमेश , शैलेश , हार्दिक , विघ्नेश , केदार , प्रथमेश, सागर ,अभिजीतच्या रूपात भाऊ मिळाले. पल्लवी सारखी आदर्श वहिनी, बहीण मिळाली,

प्रिया , तेजस्विनी, उर्मिला सारख्या आयुष्यभराच्या मैत्रीणी... प्रत्येकाबद्दल भरपूर लिहीता येईल … पण ते लिहीण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल… सतिश राजवाडे सर, अजिंक्य , मधूरा , महिपाल जी, अभिजीत गुरू, वर्षा, उत्तरा, सुवर्णा ताई , संपूर्ण ट्रम्पकार्ड टीम आणि स्टार प्रवाह टीम चे मनापासून आभार रसिक प्रेक्षकांना दंडवत .. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही.

‘तुझेच मी गीत गात आहे ‘ च्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग काल ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने प्रसारित झाला हा एक अनोखा योगायोग अजून कुठला.पुन्हा नव्या भुमिकेतून आपल्या समोर येत राहीनच.असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या . अशी भावनिक पोस्ट अभिजीतनं त्याच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com