Dwidha Teaser : हृदयस्पर्शी! बाप आणि लेकीचं हळवं नातं, ‘फादर्स डे’च्या निमित्त 'द्विधा' चा टीझर लाँच
Dwidha Teaser OutInstagram

Dwidha Teaser : हृदयस्पर्शी! बाप आणि लेकीचं हळवं नातं, ‘फादर्स डे’च्या निमित्त 'द्विधा' चा टीझर लाँच

Dwidha Teaser Out : वडील आणि मुलीमधील भावनिक बंधांच एक मार्मिक आणि हृदयस्पर्शी नातं जपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे.
Published on

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे सतीश पुळेकर यांच्या 'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टिझर १६ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला आहे. दिर्घकाळानंतर सतीश पुळेकर 'द्विधा' चित्रपटातून प्रमुख भूमिकेत येत असल्याचे दिसत आहेत. फादर्स डेच्या निमित्ताने बाप आणि लेक यांच्यातील नाजूक आणि गुंतागुंतीच्या नात्याचा जणू वेध घेणारा चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम करत आहे. या चित्रपटात वडील आणि मुली मधील भावनिक बंधांच एक मार्मिक आणि हृदयस्पर्शी नातं असल्याचं दिसत आहे.

Dwidha Teaser : हृदयस्पर्शी! बाप आणि लेकीचं हळवं नातं, ‘फादर्स डे’च्या निमित्त 'द्विधा' चा टीझर लाँच
Namrata Sambherao : "एकच हट्ट केला तोही पुरवला...", नम्रता संभेरावची ‘फादर्स डे’निमित्ताने भावुक पोस्ट

बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ट्रेलर आणि प्रोमोज संकलित करून भावनिक दृष्ट्या अनुनाद कथाकथनाचा अनुभव असणारे निलेश नाईक यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच विदुला नाईक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर यांच्यासोबत आकर्षक आणि अष्टपैलू अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रचंड प्रतिभावान अभिनेत्री मानसी कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्स आणि इतर अनेक चित्रपट, वेब सिरीजसाठी आपलं संगीत देणारे निलोत्पल बोरा यांनी चित्रपटास संगीतबद्ध केले असून मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे.

निलेश नाईक यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले, "फादर्स डेचं निमित्त साधून द्विधा चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना सादर करताना मनात एक आनंदी धाकधूक आणि उत्साह वाटत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करणे हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे. सतीश पुळेकर यांसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा भावनिक प्रवास आवडेल अशी आशा करीत आहे."

हृदयस्पर्शी संगीत आणि कॅनव्हासवर रंगवलेल्या चित्रांसारखी दिसणारी दृश्ये प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण करत आहे. वडील आणि मुलींमधील चिरस्थायी प्रेम आणि हळवे संबंध चित्रपटातून लवकरच पहायला मिळणार आहेत.

Dwidha Teaser : हृदयस्पर्शी! बाप आणि लेकीचं हळवं नातं, ‘फादर्स डे’च्या निमित्त 'द्विधा' चा टीझर लाँच
Kangana Ranaut Slapped Row : "किमान ती जिवंत आहे अन्यथा..." स्वरा भास्करने कंगना रणौतच्या 'थप्पड' प्रकरणावर सोडलं मौन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com