Namrata Sambherao : "एकच हट्ट केला तोही पुरवला...", नम्रता संभेरावची ‘फादर्स डे’निमित्ताने भावुक पोस्ट

Namrata Sambherao Post Fathers Day 2024 : वडिलांचं प्रेम, वात्सल्य, त्याग, वेदना याची जाणीव कायमच प्रत्येक मुलाला किंवा मुलीला असतेच. आजच्या दिवशी सर्वच वडिलांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करताना दिसतात.
Namrata Sambherao : "एकच हट्ट केला तोही पुरवला...", नम्रता संभेरावची ‘फादर्स डे’निमित्ताने भावुक पोस्ट
Namrata Sambherao Post Fathers Day 2024Saam Tv

आज जून महिन्यातला तिसरा रविवार. आजच्या दिवशी जगभरात ‘फादर्स डे’ सेलिब्रेट केला जात आहे. वडिलांचं प्रेम, वात्सल्य, त्याग, वेदना याची जाणीव कायमच प्रत्येक मुलाला किंवा मुलीला असतेच. आजच्या दिवशी सर्वच वडिलांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करताना दिसतात.

सध्या अनेकजणं सोशल मीडियावर ‘फादर्स डे’निमित्त इन्स्टा स्टोरी शेअर करत शुभेच्छा देताना दिसत आहे. अशातच काही मराठी सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर ‘फादर्स डे’ निमित्ताने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेली आहे. नुकतंच मराठमोळी अभिनेत्री नम्रता संभेराव हिने खास वडिलांसाठी पोस्ट शेअर केली आहे.

Namrata Sambherao : "एकच हट्ट केला तोही पुरवला...", नम्रता संभेरावची ‘फादर्स डे’निमित्ताने भावुक पोस्ट
Kangana Ranaut Slapped Row : "किमान ती जिवंत आहे अन्यथा..." स्वरा भास्करने कंगना रणौतच्या 'थप्पड' प्रकरणावर सोडलं मौन

शेअर केलेल्या पोस्टमध्ये नम्रता संभेरावने लिहिले की, "हॅप्पी फादर्स डे कायम ऐकत आलात माझं. एकच हट्ट केला तोही पुरवला आयुष्यातला माझा सगळ्यात मोठा हट्ट माझं पॅशन अभिनय, त्यात तुम्ही साथ दिलीत. तुम्ही त्यावेळी दिलेल्या परवानगीच मी वारंवार सोनं करणार तसा प्रयत्न तरी नक्कीच करणार मला जेव्हा म्हणता ना हे बघ नमू माझी कॉलर टाईट झाली खूप भारी वाटतं मला असेच खुश रहा हसत रहा थँक्यू सो मच"

नम्रता संभेरावच्या कामाबद्दल बोलायचे तर, सध्या नम्रता संभेराव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सुप्रसिद्ध कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमधून तिला महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली आहे. आतापर्यंत नम्रता नाच गं घुमा, एकदा येऊन तर बघा, वाळवी, व्हेंटिलेटर सह अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Namrata Sambherao : "एकच हट्ट केला तोही पुरवला...", नम्रता संभेरावची ‘फादर्स डे’निमित्ताने भावुक पोस्ट
Salman Khan News : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला राजस्थानमधून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com