अमेरिकेत 30 हजार भारतीय शेतमजुरांनी काम सोडलं, ट्रम्प सरकारच्या धोरणाचा शेतीला फटका

US Farm Labour Crisis: अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये ट्रम्प सरकारच्या कारवाईमुळे सुमारे 30 हजार भारतीय शेतमजुरांना काम सोडावं लागलंय. त्यामुळे अमेरिकेत शेतमाल महाग होण्याची भीती व्यक्त होतीय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय शेतमजुरांवर का कारवाई केलीय? याचे काय परिणाम होऊ शकतात. पाहूयात हा रिपोर्ट...
Trump immigration policy
Trump immigration policysaam tv
Published On: 

अमेरिकेत जवळपास 40 टक्के भूभागावर शेती केली जाते. मात्र इथं शेतमजुरांची कमतरता आहे. त्यात आता ट्रम्प सरकारच्या नव्या धोरणामुळे इथला शेती व्यवसाय अडचणीत सापडलाय. अमेरिकेतील 30 हजार भारतीय शेतमजुरांनी काम सोडलंय. कारण यापैकी अनेक मजुरांकडे अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची पूर्ण कागदपत्र नाहीत. त्यामुळे इमिग्रेशन एजन्सी ICE च्या छाप्यांची आणि पकडले जाण्याची भीती असल्यानं ते शेतांमध्ये काम करण्याचं टाळतायेत. मात्र याचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. शेतांमध्ये मजुरांची कमतरता भासल्यास फळं आणि भाज्यांचं उत्पादन तसच पुरवठा प्रभावित होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत आवश्यक कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या सुमारे 7.5 लाख भारतीयांपैकी जवळपास एक लाख जण शेतीशी संबंधित कामे करतात. ट्रम्प सरकारची इमिग्रेशन एजन्सी ICEनं ग्रामीण भागांत आणि शेतांमध्येही छापेमारी सुरू केलीय. त्यामुळे कॅलिफोर्नियापासून कॅन्ससपर्यंत अनेक ठिकाणी शेतांमध्ये मजुरांची कमतरता जाणवतीय. गेल्या दोन महिन्यांत हजारो शेतमजुरांना पकडून नजरकैद केंद्रांमध्ये ठेवण्यात आलय. काही लोकांना देशाबाहेरही पाठवण्यात आलय.

अमेरिकेत विदेशी शेतमजुरांसाठी काय आहेत नियम ?

अमेरिकेत परदेशातून आलेल्या मजुरांना शेतमजुरी करायची असल्यास प्रामुख्यानं H-2A व्हिसा अंतर्गत काम करावं लागतं. हा एक तात्पुरता किंवा हंगामी नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. कोणताही परदेशीमजूर स्वतःहून या व्हिसासाठी थेट अर्ज करू शकत नाही. अमेरिकेतील शेतकरी किंवा मालकाला आधी सरकारकडून मंजुरी घ्यावी लागते. मालकाने अर्ज मंजूर करून घेतल्यानंतरच परदेशी मजूर अमेरिकन दूतावासात H-2A व्हिसासाठी मुलाखत देऊन अर्ज करू शकतात.

शेतमजुरीसाठी लागणारे नियम अत्यंत कडक असल्यामुळे अनेक शेतमजुर कागदपत्रांची पुर्तता करू शकत नाही. आता ICEच्या कारवाईच्या भीतीमुळे अनेक भारतीय मजुरांनी शेतांमध्ये काम करणं कमी केलंय. काही जण पेट्रोल पंप, किराणा दुकानं आणि इमारतींच्या बांधकामाशी संबंधित कामांमध्ये गुंतले आहेत. काही भारतीय मजूर मेक्सिकोतही गेले आहेत, मात्र तिथल्या शेतांमध्ये काम केल्यास अमेरिकेच्या तुलनेत कमी पैसे मिळतात. त्यामुळे तिथे जाणाऱ्या भारतीय शेतमजुरांचं प्रमाण कमी आहे. अमेरिकेतल्या शेतांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाल्यास पिकांची पेरणी, देखभाल आणि कापणी प्रभावित होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा सर्वात मोठा परिणाम फळ-भाज्यांच्या किंमतींवर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.