Shruti Kadam
अलीकडेच अभिनेता यश आणि पत्नी अभिनेत्री राधिका पंडितने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये यश आणि राधिकाची रोमँटिक केमिस्ट्री खूपच गोड दिसत आहे.
राधिकाने या फोटोंसोबत लिहिलं आहे, "एका नात्यात सगळ्यात महत्त्वाचं हे नसतं की तुम्ही एकत्र काय करता, तर ते असतं की तुम्ही शांततेत काय समजून घेता."
रॉकिंग स्टार यश आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वात मोठ्या पॅन इंडिया सुपरस्टार्सपैकी एक मानला जातात.
कितीही व्यस्त असला, तरी तो आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला विसरत नाही.
सध्या यश 'टॉक्सिक: द फेयरीटेल' आणि 'रामायण: पार्ट वन' या बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
यशने मागील महिन्यात उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भगवान महादेवचे आशीर्वाद घेऊन रामायण चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात केली होती.
'केजीएफ' च्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर धमाका करत यशला सुपरस्टार बनवले आहे. पण यश फक्त एक सुपरस्टार नाही, तर एक समर्पित कुटुंबवत्सल व्यक्तीही आहे.