Forbes Magazine Named In Kedar Shinde Saam TV
मनोरंजन बातम्या

Kedar Shinde News: "थोरामोठ्यांच्या यादीत त्याला पाहिलं अन् डोळे पाणावले..."; मराठमोळ्या केदार शिंदेंचं नाव फोर्ब्सच्या यादीत,पत्नीने दिली 'अशी' प्रतिक्रिया

Forbes India Magazine 2023: अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅग्झिन 'फोर्ब्स'ने केदार शिंदेच्या कामाची दखल घेतली आहे. याबद्दलची माहिती निर्माती बेला शिंदे यांनी दिली आहे.

Chetan Bodke

Forbes Magazine Named In Kedar Shinde

२०२३ हे वर्ष खरंतर फक्त बॉलिवूडसाठीच नाही तर मराठी फिल्म इंडस्ट्रीचीही चर्चा झाली. गेल्या वर्षी 'वेड', 'बाईपण भारी देवा', 'झिम्मा २', 'सुभेदार' सह अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. यातीलच 'बाईपण भारी देवा' दिग्दर्शित केदार शिंदेच्या चित्रपटाची आजही चर्चा होताना दिसते. अशातच केदार शिंदेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅग्झिन फोर्ब्सने केदार शिंदेच्या कामाची दखल घेतलीय. (Marathi Film)

गेल्या वर्षी केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेले 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'बाईपण भारी देवा' हे दोन चित्रपट रिलीज झाले. त्यातील 'बाईपण भारी देवा'ने जबरदस्त कमाई केली असून 'महाराष्ट्र शाहीर'ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्याच्या या दोन्ही चित्रपटांतील गाणे आणि पोस्टर चांगलेच फेमस झाले होते. केदार शिंदेंच्या याच कामाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. याबद्दलची माहिती निर्माती बेला शिंदे यांनी दिली आहे.

बेला शिंदे यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये मॅग्झिनचा फोटो शेअर केला आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये, मॅगझिनने प्रदर्शित केलेल्या लेखाचा एक फोटो शेअर केला आहे. आणि त्याच्या कामाचे कौतुकही बेला शिंदे यांनी केले आहे. (Forbes Magazine)

"काल काही ठाऊक नसताना ही माझ्या आयुष्यात एक घटना घडली. Forbes India magazine मध्ये केदार विषयी लिहून आलं. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कुठल्यातरी अनोळखी व्यक्तींनी ही घेतलेली दखल. थोरामोठ्यांच्या मांदियाळीत त्याला पाहिलं. डोळे पाणावले. २७ वर्षे त्याची धडपड पहात आहे. हे सगळं घडलं ते तुम्हा रसिकांच्या प्रेमाने. स्वामी कृपेने त्याची घोडदौड अशीच सुरू राहो. त्यावर तुम्ही सगळ्यांचं प्रेम कायम राहो.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. श्री स्वामी समर्थ" अशी पोस्ट केदार शिंदेची पत्नी आणि निर्माती बेला शिंदेने लिहिली आहे. (Social Media)

बेला शिंदे यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसह काही सेलिब्रिटींनीही कमेंट करत कौतुक केले. सध्या त्यांच्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ने बॉक्स ऑफिसवर ७. ३५ कोटींची कमाई केली आहे. तर, केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९०.५ कोटींची कमाई केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT