Ira-Nupur Wedding: आयरा - नुपूरच्या मेहंदी सिरेमनीला सुरूवात, 10 जानेवारीला अडकणार विवाहबंधनात; समोर आली लग्नाची पत्रिका
Ira Khan- Nupur Shikhare Wedding:
बॉलीवूडचा (Bollywood) सुपरस्टार आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikare) यांच्या लग्नाचा सोहळा सुरू झाला आहे. मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता हे कपल उदयपूरमध्ये शाही विवाह करणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली असून दोघांचे कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार सध्या उदयपूरमध्ये पोहचले आहेत. ज्या ठिकाणी आयरा आणि नुपूरचे लग्न होणार आहे त्या ठिकाणावरून फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. अशामध्ये आता या कपलच्या लग्नपत्रिकेचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वत: आयराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये हे फोटो शेअर केले आहेत.
उद्यपूरमध्ये आयरा- नुपूरचे लग्न -
3 जानेवारीला मुंबईत लग्नाची नोंदणी केल्यानंतर आता नुपूर आणि आयरा महाराष्ट्रीय पद्धतीने राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न (Ira Khan- Nupur Shikhare Wedding) करणार आहेत. आयराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तिने तिच्या लग्न पत्रिकेची झलक दाखवली आहे. या लग्नपत्रिकेनुसार, 7 जानेवारीपासूनच लग्नाचे सर्व फंक्शन्स सुरू झाले आहेत. तर 10 जानेवारीला हे जोडपे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतील.
10 जानेवारीला महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न -
आयराने शेअर केलेली लग्नाच्या पत्रिकेचा फोटो पाहिल्यास असे दिसून येते की ही लग्नाची निमंत्रण पत्रिका खूपच छोटी आणि साधी आहे. पाहुण्यांना पाठवलेल्या आमंत्रणानुसार 8 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मेहेंदी ब्रंचने उत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर चहा आणि रात्रीचे जेवण होईल. या जोडप्याने रात्री 10 वाजता त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसाठी पायजमा पार्टीची आजोजन केले आहे. 9 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता संगीत, त्यानंतर 10 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता आयरा आणि नुपूरचा विवाहसोहळा होणार आहे.
250 पाहुणे राहणार उपस्थित -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयरा आणि नुपूरच्या कुटुंबीयांसाठी आणि पाहुण्यांसाठी 176 हॉटेल रूम बुक करण्यात आल्या आहेत. या शाही विवाह सोहळ्याला सुमारे 250 जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नात सहभागी होण्यासाठी कुटुंबीय आणि इतर पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्व पाहुणे 10 जानेवारीपर्यंत उदयपूरमध्येच राहणार आहेत. त्यांच्या राहण्या आणि खाण्याची उत्तम सोयी करण्यात आली आहे.
लग्नातला मेन्यू -
आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या मेनूमध्ये गुजराती आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश असेल. याआधी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान आमिरने अमृतसरच्या एका शेफला आणि उत्तर प्रदेशातील एका स्ट्रीट फूड क्युरेटरला अमृतसरी कुल्चासाठी बोलावले होते. इरा आणि नुपूर यांनी ३ जानेवारी रोजी मुंबईतील वांद्र्यातील ताज लँड्स एंड येथे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.
२०२२ मध्ये केला प्रपोज -
आयरा आणि नुपूरच्या मुंबईतील कोर्ट मॅरेजला आमिर खान, रीना दत्ता, किरण राव उपस्थित होते. लग्नाच्या ठिकाणी आमिरने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे स्वागत केले. यावेळी आमिर खानने कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. त्याचसोबत डोक्यावर फेटा बांधला होता. नुपूर आणि आयरा हे गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर शिखरेने 2022 मध्ये इराला प्रपोज केला होता. नुपूर हा आयरा आणि आमिरचा फिटनेस ट्रेनर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.