परळी व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला पुन्हा वेग
एसआयटी प्रमुखांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची तीन तास भेट घेतली
पत्नीने धनंजय मुंडेंचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले
वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलावर थेट आरोप
तीन वर्षांनंतरही गुन्हेगारांवर कारवाई न झाल्याने कुटुंबीयांची नाराजी
Beed Parli Mahadev Munde Murder परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने आता पुन्हा एकदा गती घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी (SIT) चे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांनी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
महादेव मुंडे यांच्या हत्येला बराच काळ लोटला असून एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, "इतका तपास करूनही पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही," अशी खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली असून, याप्रकरणी त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले. त्या म्हणाल्या की, "या केसशी मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नाही. राजाभाऊ फड यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव घेण्याचे काहीच कारण नव्हते. आमचा खरा आरोप वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलावर आहे."
सुमारे ३ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यातील २० तारखेला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास महादेव मुंडे आपल्या मुलांना ट्युशनवरून सोडून घरी परतत असताना आर्ध्यावाटेत बेपत्ता झाले. आझाद चौक पासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री ९ वाजता आढळून आली. ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून ५० मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. महादेव मुंडेंच्या या निर्घृण हत्येला ३ वर्ष उलटून देखील अद्यापही त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही. दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना आता तरी न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.