केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' अजूनही चित्रपगृहात टॅग धरीन आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ७५ दिवस होऊन गेले आहेत. हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरला आहे.
चित्रपट बनवायला आणि तो यशस्वी व्हायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. या चित्रपटामध्ये त्यासर्व गोष्टी जुळून आल्या आणि हा चित्रपट यशस्वी ठरला, असे नाही.
'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या कलाकारांनी सोनी वाहिनीवरील 'इंडियाज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. केदार शिंदे यांनी पोस्ट करत त्यांचा या सेटवरील अनुभव शेअर केला आहे.
केदार शिंदे यांची पोस्ट
केदार शिंदे यांनी पोस्ट करत लिहिली आहे की, 'काल सोनीच्या इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमात बाईपण भारी देवा टीमला खास निमंत्रित केलं होतं. फारच अभिमान वाटतो. मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर जाऊन आपला डंका वाजवतो तेव्हा ऊर भरून येतो.
मला वाटतं याआधी #सैराट या सिनेमाच्या टीमला कपिल शर्मा शोसाठी बोलवलं गेलं होतं. आपल्या मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो मात्र हे आपल्या बाबतीत हिंदीत फार होताना दिसत नाही. याचं शल्य मनात नक्कीच आहे. बाईपण भारी देवाचं संपुर्ण यश हे तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं आहे. आम्ही फक्त तुमचे प्रतिनिधी आहोत.'
यासह केदार शिंदे यांनी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'आम्ही २००४ नंतर पहिल्यांदाच भेटलो... पण ज्या पद्धतीने त्यांनी संवाद साधला, त्यावरून त्यांचा मोठेपणा दिसून येतो. आपल्याकडे एखाद्या यशाने हुरळून जाणारी मंडळी पाहिल्यावर हे जाणवतं...'
सोनाली बेंद्रेने केदार शिंदे यांच्या 'जत्रा' या चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटातील आयटम सॉंग 'ये गो ये ये मैना' सोनालीवर चित्रित करण्यात आले आहे.
केदार शिंदे यांच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. संगीतकार सलील कुलकर्णी यांनी लिहिलं आहे की, 'सुपर प्राऊड ऑफ यू', तर गायिका सावनी रवींद्रने 'प्राऊड मोमेन्ट' लिहीत कमेंट केली आहे.
बाईपण भारी देवा चित्रपटाची १०० कोटींकडे वाटचाल सुरु आहे. या चित्रपटाने ७६.०५ कोटींचा गल्ला जमावाला आहे. सहा बहिणीवर आधारितया चित्रपटाने महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रेक्षकांसह नेते, खेळाडू यांनी देखील भुरळ पडली आहे.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि राजकीय नेते राज ठाकरे यांनी देखील या चित्रापाचे खूप कौतुक केले आहे. (Latest Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.