Yashoda Serial Update: प्रेक्षकच नसतील तर काय करायचं? मराठी मालिकेच्या दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत

Zee Marathi Historic Serial: मालिकेच्या दिग्दर्शकाने एक पोस्ट करत मालिका बंद करण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
Zee Marathi Serials Go Off Air Due To Low TRP
Zee Marathi Serials Go Off Air Due To Low TRPSaam TV

Marathi Serial Yashoda Serial Director Post:

झी मराठीवरील 'यशोदा' या मालिकेचा शेवटचा भाग १९ काळ म्हणजे १९ ऑगस्टला प्रदर्शित झाला. निर्मात्यांनी ही मालिका आटपती घेतली आहे. त्यामुळे प्रेक्षक मालिकेच्या निर्मात्यांवर रागावले आहेत. दरम्यान मालिकेच्या दिग्दर्शकाने एक पोस्ट करत मालिका बंद करण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

मालिकेचे दिगदर्शक वीरेंद्र प्रधान यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, 'टीआरपी नाही हे कारण नक्कीच आहे, मालिका वेळेआधी संपवण्यामागे. उंच माझा झोका, स्वामिनी, यशोदा या गोष्टी मला पूर्ण करता आल्या नाहीत. टीआरपी नाही हेच कारण होते दरवेळी.

लोकमान्य, सावित्री ज्योती आणि अशा अनेक मालिका या कारणास्तव लवकर संपल्या. टीआरपी मिळवण्यासाठी आम्हालाही बऱ्याचदा अशा गोष्टी लिहाव्या लागतात, ज्या बऱ्याचदा आम्हाला लेखक म्हणून पटत नाहीत. वाहिन्या ही अशा गोष्टी आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. म्हणून मी, ही मालिका बंद होतेय हा कांगावा करणार नाही.

Zee Marathi Serials Go Off Air Due To Low TRP
Parineeti - Raghav Wedding Date: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या लग्नाची तारीख ठरली? या दिवशी शाही थाटात पार पडणार लग्नसोहळा

आपल्या महाराष्ट्रात उत्तम साहित्य नाही का ? दर्दी वाहिन्या नाहीत ?

आपले भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भावगीते, कविता, आपले पेहराव, ऋचा परवचा, संध्याकाळची शुभंकरोती, दिवाळी पहाट, किर्तन, लेझिम, टाळ मृदुंग, भूपाळी, काकड आरती, पदस्पर्श नमस्कार, खाडिलकर, गडकरी, पुल देशपांडे, बहिणाबाई, संत एकनाथ, साने गुरुजी, नामदेव ढसाळ, सुर्वे, शिरवाडकर, लक्ष्मण गायकवाड, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, प्रकाश नारायण संत.. हजारो लाखो गोष्टी आहेत, ज्या आपल्या मुलांसमोर यायला हव्यात.

महाराष्ट्रात आपल्याच या ठेवी दुर्मिळ आणि मलूल होत चालल्या आहेत आणि काही वर्षात त्या नामशेष होणार, असा आपला प्रवास सुरु आहे.

त्यातल्या त्यात आपापल्या कुवतीनुसार, काही लोक हे टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत पण त्यांची शक्ती कमी पडतेय. हे कुणा एका दुग्ग्याच काम नाही. समाज (टीआरपी) सोबत लागतो. राज्यकर्ते इकडे फारसे लक्ष देणार नाहीत. त्यांची टेन्शन्स वेगळी आहेत आणि का आपण कुणावर अवलंबून रहावं ?

Zee Marathi Serials Go Off Air Due To Low TRP
Milind Gawali Post: एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख... आई कुठे काय करते मालिकेचे 1000 भाग पूर्ण झाल्यानंतर मिलिंद गवळी यांची खास पोस्ट

अगदी तो राजा असला तरी, का आपण एकाच व्यवस्थेच्या माथी हा वरवंटा फोडावा? ही व्यवस्था कोण आणि का बनवतं ? आपण. अशा मालिका ही आपण बंद करतो आणि अशी सिस्टीम (व्यवस्था) ही आपण निवडून देतो.

किती लोक घरात अजून साने गुरुजींची पुस्तके वाचतात, आपल्या मुलानं वाचायला देतात? किती लोक आपले शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भावगीते, बडबडगीते ऐकतात आणि आपल्या मुलांना ऐकवतात? आम्हा लेखक दिग्दर्शकांना ही चांगले काम करायची आहेत. वाहिन्यांना ही उत्तम कंटेंट द्यायचा आहे . पण समोर प्रेक्षक नसेल तर काय करावे ?

काही लोक म्हणतील की, आम्ही आहोत तसे दर्दी प्रेक्षक. पण ही संख्या पुरेशी नाही. ती असती तर वाहिन्या अशा मालिका बंद न केल्या नसत्या. जे खपतं तेच विकतं. काळासोबत जावे असे म्हटले तर जगात अजून असे अनेक देश आहेत, ज्यांनी आपली संस्कृती सोडली नाही.

अभिमानाने जगतायत आणि उत्तम जगतायत. आपल्याकडे कलेची कदर नाही, ही खंत बोलून, किंचित वाईट वाटून, एकमेकांना वाईट साईट ठरवून, दोषारोप करून डफलीवर थाप मारून गाणारे शाहीर आजूबाजूला खुप दिसतील. परंतु आपण अशा ठिकाणी टाळ्या देण्यापेक्षा, आपल्याच घरातून संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केला तर कदाचित उद्या छान चित्र तयार होईल. ही इतर कोणाची ही जबाबदारी नाही.

लेखक, प्रेक्षक आणि व्यावसायिक म्हणून आपली जबाबदारी आहे. हे माझे व्यक्तिगत मत आहे. अजूनही चांगले आणि परिणामकारक विचार तुमचे असू शकतील. आपण व्यक्त व्हायला पाहिजे.

साने गुरुजींची श्यामची आई ही गोष्ट पूर्ण व्हावी ही माझी तीव्र ईच्छा आज ना उद्या पूर्ण होईल अशी आशा बाळगतो. या प्रवासात मला साथ करणारी झी मराठी, माझे संपूर्ण युनिट आणि अत्यंत कमी पण दर्दी प्रेक्षक यांचा मी शतश: आभारी आहे.' (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com