Milind Gawali Post: एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख... आई कुठे काय करते मालिकेचे 1000 भाग पूर्ण झाल्यानंतर मिलिंद गवळी यांची खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte Update: अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Aai Kuthe Kay Karte Completed 1000 Episode
Aai Kuthe Kay Karte Completed 1000 EpisodeInstagram
Published On

Aai Kuthe Kay Karte Completed 1000 Episode:

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिकेला तुफान प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील कलाकार देखील आता घराघरात ओळखले जातात. या मालिकेने नुकतेच १००० भाग पूर्ण केले आहेत. यानिमित्त मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारणारा अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'आई कुठे काय करते'ची संपूर्ण टीम केक कापून सेलिब्रेशन करत आहेत. हा सेलिब्रेशनचा आनंद व्यक्त करत मिलिंद गवळी यांनी एक भलं मोठं कॅप्शन लिहिलं आहे.

Aai Kuthe Kay Karte Completed 1000 Episode
Hema Malini On Gadar 2: हेमा मालिनी यांची 'गदर 2' वर प्रतिक्रिया, लेकाच्या कामाचं केलं भरभरुन कौतुक

मिलिंद गवळी यांची पोस्ट

मिलिंद गवळी पोस्ट करत लिहिले आहे की, '“श्रद्धा आणि सबुरी” ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे 1000 एपिसोड पूर्ण झाले आहेत. 7.12.2019 या मालिकेचे शूटिंग सुरू केलं, त्यावेळेला माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते, पण वाटत नक्की होतं की ही सिरीयल खूपच लोकांना भावेल, खूप आवडेल ही serial.

त्याचं मुख्य कारण म्हणजे या सीरियलच्या नावामध्ये “आई “या शब्दाचा उल्लेख आहे आणि दुसरं कारण होतं राजनजी शाही, आपल्या क्रिकेटच्या टीममध्ये सचिन तेंडुलकर आहे म्हटल्यानंतर आपली टीम भारीच खेळणार आणि जिंकणार, असा एक वेगळा कॉन्फिडन्स खेळाडूंना असेल ना, तसाच.

आमच्या या “आई कुठे काय करते”च्या टीममध्ये राजन शाही आहेत, राजन शाही एक मराठी सीरियल करतायेत म्हटल्यावर ती उत्कृष्टच होणार, याची एक वेगळीच खात्री सगळ्यांना होती. डायरेक्टर्स कम प्रोडक्शनचे सर्वेसर्वा राजनजी, हे आम्हाला प्रोड्युसर लाभले होते.

नमिता वर्तक म्हणजेच कमलाकर नाडकर्णी यांची कन्या, जिने खरंतर मला या सीरियलसाठी माझी “अनिरुद्ध देशमुख” या पात्रासाठी निवड केली, उत्कृष्ट इतर सगळे कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शनाची टीम, उत्कृष्ट सेटिंग, उत्कृष्ट लेखन, सगळंच या सीरियल मधलं भारी होतं.

स्टार प्रवाह चॅनलने सुद्धा सीरियलचे प्रमोशन उत्कृष्ट केले होते, पहिल्या दिवसापासूनच लोकांच्या मनामध्ये ही सीरियल बसली, खरंतर मी एक odd man out होतो, मी जे कॅरेक्टर करत होतो अनिरुद्ध देशमुख नावाचं, ते सुद्धा odd man out आहे,

पहिल्यांदा ज्यावेळेला नमिताने माझी राजन शाही यांच्याशी ओळख करून दिली, त्यावेळेला माझ्याविषयी त्यांच्या डोळ्यांमध्ये मला फार काही confidence दिसला नाही, तसं ते मला काही बोलले नाहीत तरी, पहिल्या भेटीत मला ते जाणवलं होतं, पण त्यांचा नमितावर खूप कॉन्फिडन्स होता आणि तिच्यावर खूप विश्वास होता, आणि म्हणून खरंतर माझं कास्टिंग या इतक्या भारी रोलसाठी झालं. (Latest Entertainment News)

“ श्रीमोई “ नावाची बंगाली मालिकेचं हे सुरुवातीला रूपांतरण होतं, त्यामध्ये जो अनिरुद्ध देशमुख होता, तो अगदी भारदस्त व्यक्तीमहत्त्व होतं, त्याचे काही episodes मला राजनजींनी पाहायला सांगितले होते, ते भाग पाहिल्यानंतर मी जरा घाबरलोच होतो.

अमरीश पुरीसारखी त्याची पर्सनॅलिटी होती, team ने मला सांभाळून घेतलं, एक हजार एपिसोडनंतर सुद्धा मला सांभाळून घेत आहेत, त्यांनी एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख माझ्याकडून करून घेतला, या आई कुठे काय करतेच्या टीमने.

DKP राजन जी, स्टार प्रवाहपासून आमच्या अगदी स्पोर्ट बॉयपर्यंत सगळ्यांचा मी ऋणी आहे सगळ्यांचा मी आभारी आहे ! आज सेटवर छान हवन पूजा झाली, 1000 एपिसोडचा केक आज आम्ही कापला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com