Hema Malini On Gadar 2: हेमा मालिनी यांची 'गदर 2' वर प्रतिक्रिया, लेकाच्या कामाचं केलं भरभरुन कौतुक
Hema Malini Praised Sunny Deon For Gadar 2:
'गदर २'ची सध्या बॉक्स ऑफिसवर हवा आहे. या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा देखील पार केला आहे. २२ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या गदर एक प्रेमकथा या चित्रपटाच्या सिक्वेलवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.
सनी देओलच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे, त्याचबरोबर त्याचे कुटुंबीय देखील चित्रपट पाहिल्यानंतर सनीचे कौतुक करत आहेत. 'गदर २'च्या प्रीमियरला सनी देओलचा भाऊ बॉबी देओल आणि त्याच्या सावत्र बहिणी आणि हेमा मालिनी यांच्या मुली ईशा, आहाना देखील उपस्थित होत्या.
सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी यांनीही नुकताच 'गदर २' चित्रपट पहिला. त्या चित्रपट पाहून बाहेर पडत असताना पापाराझींनी त्यांना घेरलं. यावेळी हेमा मालिनी यांनी चित्रपटाविषयी आणि कलाकारांच्या अभिनयाविषयी त्यांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या.
गदर २ चित्रपट हेमा मालिनी यांना खुपच आवडला असल्याचे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. चित्रपटाविषयी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, मी नुकतीच गदर २ पाहून आले आहे. चित्रपट खूप सुंदर आहे. चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे. प्रेक्षक देखील चित्रपटाचा आनंद घेत आहेत.
चित्रपट पाहिल्यानंतर मला पुन्हा 70 आणि 80 च्या दशकात गेल्यासारखं वाटलं. अनिल शर्मा जी यांनी खुपच उत्तम दिग्दर्शन केलयं. सनीनेही खुपच छान अभिनय केला आहे. उत्कर्ष शर्मा आणि सिमरत यांनी देखील छान काम केलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, "हा सिनेमा पाहिल्यानंतर देशप्रेमाच्या भावनेने मन भरुन येते. हिंदू आणि मुस्लिमांप्रती बंधुभाव असायला हवा हा विषय चित्रपटात शेवटपर्यंत दाखवण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानसाठी खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे."
सनी देओल आणि अमिषाच्या जोडीबद्दल बोलतांना हेमा मालिनी म्हणाल्या की, "22 वर्षांनंतरही सनी आणि अमिषा एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. दोघांनी खूप चांगलं काम केलं आहे. चित्रपटाची गाणी त्याकाळी खूप हिट झाली होते आणि त्याचा रिमेक केल्यानंतरही गाणी खुप छान झाली आहेत. चित्रपट खूप छान आहे." (Latest Entertainment News)
'गदार २' चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ३०० कोटींचा गल्ला केलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. सनी देओलच्या कारकिर्दीतील इतकी कमाई करणार हा पहिला चित्रपट ठरला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.