Vidyadhar Joshi Suffered Illness: बाप्पा जोशींना झाला होता जीवघेणा आजार, पार पडली मोठी शस्त्रक्रिया

Vidyadhar Joshi News: संपूर्ण इंडस्ट्रीत 'बाप्पा' म्हणून ओळखले जाणारे विद्याधर जोशी एका नवीन कारणांनी चर्चेत आले आहे.
Vidyadhar Joshi Talked On His Lungs Was Not Working
Vidyadhar Joshi Talked On His Lungs Was Not WorkingSaam Tv
Published On

Vidyadhar Joshi Talked On His Lungs Was Not Working: 'बिग बॉस' फेम अभिनेते ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण इंडस्ट्रीत 'बाप्पा' म्हणून ओळखले जाणारे विद्याधर जोशी एका नवीन कारणांनी चर्चेत आले आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वाईट प्रसंग येतो असं म्हणतात. तसंच काहीस विद्याधर जोशी यांच्यासोबत मागील १० महिन्यात घडले.

कोविडच्या काळात प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या अडचणींचा सामना करत होता. याच काळात विद्याधर जोशींनीही खूप वाईट काळाचा सामना केला. विद्याधर जोशींनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या वाईट काळाविषयी सांगितले आहे.

Vidyadhar Joshi Talked On His Lungs Was Not Working
Border 2: सनी देओलचा स्वॅगच न्यारा, ‘गदर २’नंतर आणखी एका सिक्वेलमध्ये झळकणार

कोरोनाच्या पहिल्या लाटेत विद्याधर जोशींना कोरोना झला. त्यावेळी ते 'माझा होशील ना' या मालिकेत काम करत होते. त्यांनी त्यावेळी कोरोनावर मात केली असं त्यांना वाटलं. परंतु काही दिवसांनी त्यांना पुन्हा एकदा कोरोना झाला. त्यावेळी त्यांना काहीतरी गंभीर असल्याचे जाणवले. त्यांनी सिटी स्कॅन केला तेव्हा त्यांना फुफ्फुसांचा फायब्रॉसिस झाल्याचे समजले.

डॉक्टरांचा सल्ला घेतला. काही तपासण्या केल्या. त्यादरम्यान त्यांचे फुप्फुसं १३ टक्के निकामी झाल्याचे त्यांना सांगितले. त्याच काळात त्यांना कधी न बरा होणारा आजार (आयएलडी-इन्टरस्टिशिअल लंग्ज डिसीज) झाल्याचे समजले. त्यावर औषध नाहीत. फक्त आजार कंट्रोलमध्ये राहण्यासाठी औषधे देतात. अशा परिस्थितीही त्यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं.

Vidyadhar Joshi Talked On His Lungs Was Not Working
Teen Adkun Sitaram Announcement: ‘तीन अडकून सीताराम…’ नेमकी भानगड काय?; २९ सप्टेंबरला होणार खुलासा

'जिवाची होतिया काहिली' या मालिकेदरम्यान त्यांना पुन्हा त्रास झाला. मागील वर्षी डिसेंबर,जानेवारीमध्ये त्यांचा हा आजार वाढत होता. त्यावेळी मला समजलं की,माझं ८० ते ८५ टक्के निकामी झाले आहे. यावर लंग्ज ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय होता. हा उपाय करणे खूप खर्चीक होते. परंतु माझा परिवार आणि मित्रांनी मिळून हा निर्णय घेतला. डॉ. संदीप अट्टावार आणि डॉ. उन्मील शहा यांच्या टीमनं माझ्यावर मुंबईत १२ जानेवारी २०२३ या दिवशी शस्त्रक्रिया केली. असं विद्याधर जोशींनी एका मुलाखतीत सांगितलं.

Vidyadhar Joshi Talked On His Lungs Was Not Working
Ameesha Patel On Gadar 2: गदर २ सुपरहिट, मात्र अमिषाला चित्रपटातल्या ‘या’ गोष्टी खटकल्या; मुलाखतीत म्हणाली...

विद्याधर जोशींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अनेक मालिका, चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ते बिग बॉस मराठीमध्येही दिसले होते. तर त्यांनी रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com