Parineeti - Raghav Wedding Date: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या लग्नाची तारीख ठरली? या दिवशी शाही थाटात पार पडणार लग्नसोहळा

Parineeti Chopra-Raghav Chadha: अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे.
Parineeti Chopra - Raghav Chadha Fix Wedding Date
Parineeti Chopra - Raghav Chadha Fix Wedding Date Instagram @parineetichopra
Published On

Parineeti Chopra and Raghav Chadha's Wedding In September:


परिणीती चोप्रा नई राघव चड्ढा हे सध्या चर्चेत असलेले जोडपे आहे. काही महिन्यापूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला. राघव-परिणीतीचे लग्न कधी होणार यांची उत्सुकता अनेकांना आहे. अखेर या दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे जोडपे २५ सप्टेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.

Parineeti Chopra - Raghav Chadha Fix Wedding Date
Milind Gawali Post: एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख... आई कुठे काय करते मालिकेचे 1000 भाग पूर्ण झाल्यानंतर मिलिंद गवळी यांची खास पोस्ट

ईटाइम्स या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हे एक ग्रँड सेलिब्रेशन असणार आहे. परिणीती तिच्या या सोहळ्याबद्दल काहीच बोलताना दिसत नाही. तिच्या टीमने लग्नाच्या तयारीला खूप आधीपासूनच सुरुवात केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परिणीती देखील लग्नाच्या तयारीलासुरुवात करेल.'

सूत्रांनी दिलेली माहिती अशी देखील आहे की, 'परिणीती-राघवचे लग्न राजस्थानमध्ये होणार असून रिशेप्शन गुरुग्राममध्ये होणार आहे.'

परिनीती सध्या 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' या बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटामध्ये ती अक्षय कुमारसोबत काम करणार आहे.

ईटाइम्सने अभिनेत्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने याविषयी कोनतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

परिणीती आणि राघव यांचा दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. तेव्हापासून त्यांना त्यांच्या लग्नाविषयी विचारण्यात येत आहे. परंतु दोघांनीही याबाबतीत मौन बाळगले आहे.

साखरपुडा झाल्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्याचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंना सुंदर कॅप्शन देत कामेकांचे कौतुक देखील केले होते.

लग्नआधी आणि लग्नानंतर राघव - परिणीती अनेकदा स्पॉट झाले आहेत. लग्नाचा व्हेन्यू ठरवताना देखील दोघे एकत्र फिरताना दिसले होते. सुवर्णमंदिरात देखील दोघांनी एकत्र सेवा केली होती. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com