Maharashtra Shaheer On OTT: अखेर प्रतीक्षा संपली, ‘महाराष्ट्र शाहीर’ ओटीटीवर; कधी, कुठे, कसा पाहणार, वाचा सविस्तर

Maharashtra Shaheer Film OTT Release: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला असून आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
Maharashtra Shaheer On OTT
Maharashtra Shaheer On OTTInstagram
Published On

Maharashtra Shaheer Release On Amazon Prime: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट गेल्या ३० एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास --- कोटींची कमाई केली. शाहीर साबळे यांच्या जीवनातील विविध पैलू या चित्रपटातून उलगडण्याचे काम शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी केले आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला असून आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Maharashtra Shaheer On OTT
Naseeruddin Shah Statement: नसीरूद्दीन शाह यांना नक्की कुठे आत्मविश्वास नडला? शेअर केला ओम पुरीसोबतचा ‘तो’ किस्सा...

चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असून प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत होते. प्रेक्षकांना चित्रपट ओटीटीवर पाहण्याची फारच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे. चित्रपट येत्या २ जूनला ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना चित्रपट पाहायला मिळणार आहे. चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्याची माहिती दिग्दर्शकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Maharashtra Shaheer On OTT
Madhuri And Karishma Dance: २५ वर्षांनंतर माधुरी आणि करिष्मा पुन्हा आल्या एकत्र, ‘दिल तो पागल है’ म्हणत चाहत्यांनी केले डान्सचे कौतुक

चित्रपटाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सांगितले, “पद्मश्री कृष्णराव साबळे यांचे जीवन उलगडणारा चित्रपटपाहून तुमचेही हृदय अभिमानाने फुलून जाईल. ‘महाराष्ट्र शाहीर’ येत्या २ जूनपासून ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना चित्रपट पाहायला मिळणार आहे.”

चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. तर चित्रपटात प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी, सना शिंदे सह अनेक सेलिब्रिटी आहेत. अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका तर सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साळबे यांची भूमिका साकारली.

चित्रपटातील गाण्याबद्दल बोलायचे तर, चित्रपटाचे संगीत फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगभरात गाण्यांचे कौतुक होत आहे. ‘बहरला मधुमास नवा’ या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी या गाण्यावर रिल्स बनवत शेअर केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com