Naseeruddin Shah Statement: नसीरूद्दीन शाह यांना नक्की कुठे आत्मविश्वास नडला? शेअर केला ओम पुरीसोबतचा ‘तो’ किस्सा...

Naseeruddin Shah On Om Puri Friendship: NSD मध्ये असताना नसीरूद्दीन शाह त्यांचे जवळचे मित्र आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना भेटलो होतो, एका मुलाखतीत त्यांनी दोघांच्या ही मैत्रीवर भाष्य केले.
Naseeruddin Shah On Om Puri Friendship
Naseeruddin Shah On Om Puri FriendshipSaam Tv
Published On

Naseeruddin Shah And Om Puri Friendship: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमीच आपल्या अभिनयासह वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सर्वाधिक सक्षम अभिनेत्यांपैकी एक असलेले नसीरूद्दीन शाह यांनी आपल्या अभिनयाची छाप सिनेसृष्टीत निर्माण केलीय. चित्रपटांसह आता ओटीटीवर देखील त्यांनी पदार्पण केलेय. नुकताच नसीरूद्दीन शाह यांनी आपण अभिनयात का मागे राहिलो, या विषयावर भाष्य केले. नसीरुद्दीन शाह यांनी अलीकडेच हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले. त्यांनी कबूल केले की, अभिनय क्षेत्रात डेब्यू केले तेव्हा अभिनयात अति आत्मविश्वास होता, तो त्यांना कुठे नडला? याबद्दल सांगितले.

Naseeruddin Shah On Om Puri Friendship
Madhuri And Karishma Dance: २५ वर्षांनंतर माधुरी आणि करिष्मा पुन्हा आल्या एकत्र, ‘दिल तो पागल है’ म्हणत चाहत्यांनी केले डान्सचे कौतुक

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत नसीरूद्दीन शाह म्हणतात, “नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये वयाच्या विशी पासून जात आहे. तेव्हापासूनच माझ्या मनात आत्मविश्वास आहे, मला आधीपासून वाटायचं की, मी खूप चांगला अभिनय करतो. पहिल्यापासून माझी वृत्ती मला लीड रोल मिळावा अशी होती.” (Bollywood Actor)

लीड रोल का मिळत नाही? ही खदखद नेहमीच माझ्या मनात होती. मी अपेक्षेप्रमाणे अधिकच चांगला अभिनय करेल, हा देखील विश्वास मला होता. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ही वृत्ती हळूहळू नाहीशी झाली. NSD मध्ये असताना माझा जवळचा मित्र आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना भेटलो होतो. त्यावेळी ओम पुरी घाबरलेले, नर्व्हस, लाजाळू आणि अंतर्मुख स्वभावाचे होते.”

ओम पुरी तेव्हा अलीगढ विद्यापीठात देखील परफॉर्म करायचे आणि त्यांचे एनसडीसाठी काही मोठी स्वप्ने देखील होते. दोघेही एनएसडीमध्ये काम करत असताना, नसीरुद्दीनच्या लक्षात आले की ओम ३ वर्षात किती पुढे आला आहे. नसीरुद्दीनसाठी हा खूप त्रासदायक विचार होता. कारण जेव्हा ते एनएसडीमध्ये आले तेव्हा मी तिथल्या तिथेच आहे, असे वाटत होते.

Naseeruddin Shah On Om Puri Friendship
Pushpa 2 Team Accident: 'पुष्पा 2' टीमच्या गाडीचा भीषण अपघात, चित्रपटातील कलाकार जखमी

नसीरूद्दीन शाह यांनी स्वतःच्याच मनाला विचारले, “मी इथे आलो तेव्हा सहज अभिनय करू शकत होतो. तर इकडे येऊन काय शिकलो? असा प्रश्न मला उद्भवायचा. मी आता काय करणार आहे? मी पैसे कमवायला कुठे जाऊ?” असे अनेक प्रश्न उद्भवायचे. एनएसडीनंतर ओम दिल्लीत राहिले आणि नसीरुद्दीन यांनी चित्रपटसृष्टीत डेब्यु केले. त्यानंतर नसीरूद्दीन शाह यांना चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. त्या एका टप्प्यानंतर, ‘मला कधीही वाटले नाही की आपण कोणत्याही प्रोजेक्टला सहजरित्या क्रॅक करू शकतील.’

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com