Manasvi Choudhary
आजकाल बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य देखील बिघडू लागले आहे. यासाठी तुम्ही नियमितपणे व्यायाम करणे महत्वाचे आहे.
मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी सकाळी नेमकी कोणती योगासने करावी हे जाणून घ्या.
बालासन हा योगा प्रकार तुम्ही गुडघ्यावर बसून कपाळ जमिनीवर ठेवून करा तसेच हात पुढे किंवा मागे सैल सोडा यामुळे मानसिक थकवा दूर होईल.
एका पायावर उभे राहून दुसरा पाय पहिल्या पायाच्या मांडीला टेकवा आणि हात वर करून नमस्काराच्या स्थितीत राहा.
हाताचे तळवे आणि पाय जमिनीवर टेकवून शरीराचा इंग्रजी 'V' सारखा आकार करा. या योगासनामुळे यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे ताण कमी होऊन मन फ्रेश होते
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.