Prajakta Mali Wishes Raj Thackeray On His Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Thackeray Birthday : “फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव....”, राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ता माळीची खास पोस्ट

Prajakta Mali Wishes Raj Thackeray On His Birthday : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Chetan Bodke

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५६ वा वाढदिवस आहे. राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे, म्हटल्यावर त्यांच्या 'शिवतिर्थ' या निवासस्थानी राज्यभरातून मनसेचे लाखो कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी करीत आहे. सोशल मीडियासह सर्व माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अशातच मराठी सेलिब्रिटींनीही राज ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

प्राजक्ताने राज ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओला तिने मनसे पक्षाचं अँथम साँग लावलेलं आहे. अभिनेत्री कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आदरणीय ‘आपणांस’ वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा… राज ठाकरे जी… जे करण्याची इच्छा आहे, ते काम हातात यावं. काम करताना आनंद मिळावा. त्यातून समाधान लाभावं; या वाढदिवसानिमित्त तुम्हाला माझ्याकडून आणि ‘प्राजक्तराज परिवाराकडून’ शुभकामना. फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव हसत रहा, प्रसन्न रहा. खूप शुभेच्छा.”

शेअर केलेल्या ह्या व्हिडीओमध्ये, प्राजक्ताने राज ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. प्राजक्ताने गेल्या काही दिवसांपूर्वी 'प्राजक्ताराज' नावाच्या ज्वेलरी ब्रँडचं ओपनिंग केलं होतं. त्या दरम्यानचे फोटोज ते आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या. प्राजक्ताने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. २३ हजारांहून अधिक चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स मिळाले असून २ लाख ४५ हजारांहून अधिक चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचं तर, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्राजक्ता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच ती येत्या काही काळात वेगवेगळ्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

SCROLL FOR NEXT