Maharaj Film : आमिर खानच्या मुलाचा 'महाराज' चित्रपट सध्या प्रदर्शित होणार नाही, हायकोर्टानंच थांबवलं; काय आहे वादाचं कारण?

High Court Halts Release Of Maharaj Movie : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान 'महाराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. त्याचा पहिलाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून गुरूवारी गुजरात हायकोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थिगिती दिली आहे.
Maharaj Film : आमिर खानच्या मुलाचा 'महाराज' चित्रपट सध्या प्रदर्शित होणार नाही, हायकोर्टानंच थांबवलं; काय आहे वादाचं कारण?
High Court Halts Release Of Maharaj MovieSaam TV

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान 'महाराज' या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करत आहे. त्याचा पहिलाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जुनैदचा 'महाराज' चित्रपट १४ जूनला 'नेटफ्लिक्स' या ओटीटीवर रिलीज होणार होता. पण या चित्रपटाचं प्रदर्शन हायकोर्टाकडून थांबवण्यात आले आहे. गुरूवारी जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटाला गुजरात हायकोर्टाने प्रदर्शनाला स्थिगिती दिली आहे. या चित्रपटाविरोधात काही हिंदू संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. चित्रपटात हिंदू धर्माविरोधात काही गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Maharaj Film : आमिर खानच्या मुलाचा 'महाराज' चित्रपट सध्या प्रदर्शित होणार नाही, हायकोर्टानंच थांबवलं; काय आहे वादाचं कारण?
Radhika Merchent Pre Wedding Look : अंबानींची सौंदर्यवती सूनबाई ! राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग लूकने वेधलं लक्ष

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, गुजरात हायकोर्टाने गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, 'आज (गुरूवारी) पुष्टीमार्ग संप्रदायाच्या अनुयायांनी गुजरात उच्च न्यायालयात याचिता दाखल केली होती. या याचिकेवर गुजरात हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने ब्रॉडकास्टिंग अथॉरिटी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आणि 'महाराज' चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म, ओटीटी नेटफ्लिक्स यांना नोटीस बजावली. गुरूवारी दिलेल्या निर्णयानुसार, उच्च न्यायालयाने १८ जून २०२४ पर्यंत या चित्रपटावर ओटीटी आणि मीडिया प्रसारणावर बंदी घातली आहे.

सन १८६२च्या महाराज बदनाम प्रकरणावर आधारित हा चित्रपट कायदा-सुव्यवस्था बिघडवेल. तसेच हिंदू धर्माच्या अनुयायांविरुद्ध हिंसाचार भडकवेल असा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. म्हणून न्यायालयाने या चित्रपटावर बंदी घातली होती. सन १८६२मध्ये एका प्रतिष्ठित महाराजाने केलेल्या कथित गैरवर्तणुकीवर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. त्यावर तत्कालीन मुंबईच्या कोर्टातील इंग्लिश न्यायाधीशांनी यावर निकाल दिला होता. यामध्ये हिंदू धर्माविरोधात आणि भगवान श्रीकृष्णाविरोधात टिप्पणी केली होती.

Maharaj Film : आमिर खानच्या मुलाचा 'महाराज' चित्रपट सध्या प्रदर्शित होणार नाही, हायकोर्टानंच थांबवलं; काय आहे वादाचं कारण?
Kirron Kher Birthday : संकटांनी पाठ सोडली नाही, तरीही नेहमी चेहऱ्यावर हास्य; 'किरण खेर'चा अंगावर काटे आणणारा प्रवास, एकदा वाचाच

चित्रपटाला विरोध होऊ नये यासाठी चित्रपट शांतपणे प्रदर्शित केला जाणार होता. न्यायालयात चित्रपटाविरोधात युक्तिवादही करण्यात आला होता. या याचिकेची दखल गुजरात हायकोर्टाच्या न्यायमूर्ती संगीता विषेन यांनी घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १८ जून रोजी होणार आहे. जो पर्यंत युक्तिवाद पूर्ण होणार नाही, तो पर्यंत चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली जाणार नाही.

Maharaj Film : आमिर खानच्या मुलाचा 'महाराज' चित्रपट सध्या प्रदर्शित होणार नाही, हायकोर्टानंच थांबवलं; काय आहे वादाचं कारण?
Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला चार वर्ष पूर्ण, टीव्ही इंडस्ट्रीतून केली होती अभिनयाला सुरुवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com