Radhika Merchent Pre Wedding Look : अंबानींची सौंदर्यवती सूनबाई ! राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग लूकने वेधलं लक्ष

Radhika Merchent Look : गेल्या काही दिवसांपूर्वी अनंत- राधिका यांचं दुसरं प्री- वेडिंग इटलीमध्ये पार पडलं. सध्या राधिका मर्चंटसह नीता अंबानी यांच्या प्री-वेडिंगमधील लूकची चर्चा होत आहे.
Radhika Merchent Pre Wedding Look : अंबानींची सौंदर्यवती सूनबाई ! राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग लूकने वेधलं लक्ष
Radhika Merchent Pre Wedding LookSaam Tv

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपु्त्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासोबत मुंबईत १२ जुलै रोजी विवाहबद्ध होणार आहेत. या कपलचं नुकतंच दुसरं प्री- वेडिंग झाले आहे. त्यांचं हे दुसरं प्री- वेडिंग इटलीमध्ये पार पडले. यावेळी अंबानी कुटुंबीयांकडून 'नो फोन पॉलिसी'चा वापर केला होता. अशातच सध्या राधिका मर्चंटसह नीता अंबानी यांच्या प्री-वेडिंगमधील लूकची चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर राधिका मर्चंटचे प्री- वेडिंगमधील अनेक फोटोज् व्हायरल होत आहे.

Radhika Merchent Pre Wedding Look : अंबानींची सौंदर्यवती सूनबाई ! राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग लूकने वेधलं लक्ष
Kirron Kher Birthday : संकटांनी पाठ सोडली नाही, तरीही नेहमी चेहऱ्यावर हास्य; 'किरण खेर'चा अंगावर काटे आणणारा प्रवास, एकदा वाचाच

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत सध्या लग्नामुळे बराच चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनंत- राधिका यांचा दुसरा प्री- वेडिंग पार पडला. यावेळी राधिका तिच्या प्री-वेडिंग लूकमुळे बरीच चर्चेत आहे. राधिकाने प्री- वेडिंगसाठी प्रिंसेस लूक कॅरी केला होता. टू पीस मॅटेलिक ऑफ शोल्डर ड्रेस आणि पेन्सिल स्कर्ट राधिकाने वेअर केलेला होता. लूकला साजेसा मेकअप आणि दागिने कॅरी करत तिने आपला संपूर्ण लूक केलेला होता.

राधिका मर्चंटसोबतच ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांनीही आपल्या हटक्या स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. अंबानी कुटुंबीयांकडे कोणताही इव्हेंट असो ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांच्या फॅशनची जोरदार चर्चा कायम होतेच. अनंत- राधिका यांच्या साखरपुड्या वेळीही आणि दोन्हीही प्री-वेडिंगला अंबानी कुटुंबीयांच्या फॅशनची जोरदार चर्चा झाली होती. त्यांच्या फॅशनची चर्चा जगभरात होते.

Radhika Merchent Pre Wedding Look : अंबानींची सौंदर्यवती सूनबाई ! राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग लूकने वेधलं लक्ष
Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला चार वर्ष पूर्ण, टीव्ही इंडस्ट्रीतून केली होती अभिनयाला सुरुवात

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तारीख आणि स्थळ जाहीर झालेलं आहे. अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा १२ जुलैला रोजी मुंबईतल्या बीकेसीमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. १२ ते १४ जुलै असा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे.

Radhika Merchent Pre Wedding Look : अंबानींची सौंदर्यवती सूनबाई ! राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग लूकने वेधलं लक्ष
Gharat Ganpati Film : अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमणार, ‘घरत गणपती’मध्ये करणार एकत्र स्क्रीन शेअर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com