Gharat Ganpati Film : अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमणार, ‘घरत गणपती’मध्ये करणार एकत्र स्क्रीन शेअर

Ajinkya Deo And Ashwini Bhave Film : ९० च्या दशकातील प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये अजिंक्य देव आणि अश्विनी भावे यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. आता लवकरच ही जोडी एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Gharat Ganpati Film : अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमणार, ‘घरत गणपती’मध्ये करणार एकत्र स्क्रीन शेअर
Ajinkya Deo And Ashwini Bhave FilmSaam Tv

९० च्या दशकातील लोकप्रिय जोड्यांमध्ये अजिंक्य देव आणि अश्विनी भावे यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता लवकरच एका मराठी चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘घरत गणपती’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाची रिलीज डेटही निर्मात्यांनी जाहीर केलेली आहे.

Gharat Ganpati Film : अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमणार, ‘घरत गणपती’मध्ये करणार एकत्र स्क्रीन शेअर
Maharaj Film Boycott : आमिर खानच्या मुलाचा चित्रपट वादात अडकला; जुनैदच्या चित्रपटाला हिंदू संघटनांचा विरोध

पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरत गणपती’ हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत.

या चित्रपटात अजिंक्य देव आपल्याला कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत. याआधी ‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आता २५ वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल, असं हे दोघे सांगतात. चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.

Gharat Ganpati Film : अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमणार, ‘घरत गणपती’मध्ये करणार एकत्र स्क्रीन शेअर
Matka King Start Shooting : नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री, वेबसीरीजच्या शुटिंगला सुरुवात

आधीच्या चित्रपटातील या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र असणं हा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. श्री गणराया’च्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Gharat Ganpati Film : अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमणार, ‘घरत गणपती’मध्ये करणार एकत्र स्क्रीन शेअर
Sonakshi And Zaheer Wedding Card : अखेर ठरलं! सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग कार्ड व्हायरल; लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांना पाळाव्या लागतील अटी शर्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com